एककडे नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात तिसरा क्रमांक मिळाला. तर दुरीकडे मुंबई व महाराष्ट्राला जोडणाऱ्या सायन- पनवेल मार्गावरील पालिका हद्दीत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावरील दिवे सतत लुकलुक करत असल्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. अपुऱ्या विजव्यवस्थेमुळे व महामार्गावरील अनेक बंद दिव्यांमुळे पालिकेला सातत्याने नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या मार्गावरील पथदिवे बंद असे आरोप होत असल्याने पालिकेची बदनामी होत आहे. पालिकेने याच महामार्गावरील पथदिव्यांची लुलकुल बंद केली असून ११९४ पैकी तब्बल ६२८ बंद असलेल्या दिव्यांची दुरुस्ती करुन महामार्ग प्रकाशमय केला आहे. त्यामुळे सायन पनवेल महामार्गावरील नवी मुंबई महापालिका हद्दीतील पथदिव्यांची लुकलुक बंद झाली आहे.

हेही वाचा- उरण : बिबट्या आला रे आला….

पालिका महामार्गावरील पथदिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीसह नवीन एलईडी दिवे लावण्याचे १०.५४ कोटींचे काम करणार असून याच्या प्राथमिक कामाला सुरवात करण्यात आली आहे. नवी मुंबई हद्दीतून जामाऱ्या महामार्गावरील वाशी टोल नाका ते सी.बी.डी. बेलापूर हा भाग नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत येत असून सदर मार्गाची मालकी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याने व त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने त्याच्या दूरवस्थेविषयी ,सततच्या दिवाबत्ती विषयी प्रवाशी, नागरिकांकडून नवी मुंबई महानगरपालिकेस दोष दिला जात होता.

याचा परिणाम नवी मुंबई शहराच्या स्वच्छ व सुंदर प्रतिमेवर सातत्याने होत होता. ९ डिसेंबर २०२१ ला पालिकेकडे दिवाबत्ती हस्तातंरीत करण्यात आली. दिवाबत्तीच्या कामासाठी करोडो रुपये खर्चातून महामार्गावरील एलईडी दिवाबत्ती लावली जाणार आहे. संबंधित ठेकेदाराला याचा कार्यादेश दिला आहे.त्यामुळे तात्काळ कामाला सुरवात झाली असून पालिकेने या मार्गावरील सुरवातीला महमार्गावरील अंधार दूर करण्यासाठी ६२८ बंद दिव्यांची दुरुस्ती केली आहे. एकीकडे कधी बंद तर कधी चालू असे मध्येच लुकलुकणारे दिवे दुरुस्त करुन दिव्यांची दुरुस्ती केली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत वीज वितरण परवान्यासाठी ‘अदानी’चा अर्ज; महाराष्ट्रात वीज क्षेत्रात खासगीकरण पर्वाची चाहूल

सहशहर अभियंता शिरीष आरदवाड व कार्यकारी अभियंता सुनील लाड यांंच्या प्रयत्नातून कामाला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. पालिकेने प्रथम महामार्गाचा सर्व्हे करुन बंद दिवे दुरुस्त करुन घेतले आहे. तसेच महामार्गावरील धोकादायक व खराब झालेले पथखांब काढून घेण्याचे काम सुरु असून विविध भागात ट्रान्सफार्मर बदलण्याचे काम सुरु आहे. याच मार्गावर पालिका सर्व पथदिवे एलईडीचे लावणार आहे. त्यातून वीजबचत होणार असून सातत्याने महामार्गावर होणारी पथदिव्यांची डोळेमिचकावणी बंद होणार आहे. दिवाबत्ती हस्तांतरित करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने ८ कोटी २९ लाखांची रक्कम पालिकेने प्रदान केली आहे.

परंतू आर्थिक बोजा पालिका उचलत असताना विद्युत खांब्यावरील जाहीरात हक्कही प्राप्त होणे आवश्यक आहे. एमएसआरडीसीच्या बेलापूर ,नेरुळ वाशी येथील उड्डाणपुलावील दिवाबत्तीची व्यवस्थाही भविष्यात पालिकेला हस्तांतरीत करुन घ्यावी लागेल. अथवा रस्ते उजेडात उड्डाणपुल अंधारात अशी स्थिती होण्याची शक्यता आहे. एलईडी लावण्यासाठी रॉयल पॉवर टेक या कंपनीला या कामाचे कार्यादेश दिले असून एलईडी फिटींग लावण्याबरोबरच ५ वर्षाची देखभाल दुरुस्तीही संबंधित ठेकेदाराला दिली आहे. या मार्गावरील एलईडी फिटींगमुळे महिना वीजबिलात ९४ लाखाची बचतही होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरीत करण्यात आलेल्या दिवाबत्तीच्या खांबांवरील जाहिरातीचे अधिकारही पालिकेला मिळण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली; कोणतीही जीवित हानी नाही

नव्या आयुक्तांचे महामार्गावर बारीक लक्ष ……

नवनिर्वाचित पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबई पालिका हद्दीतून जाणारे व नवी मुंबईला मुंबईशहरातील महामार्ग व त्यांची सुविधा अधिक वाढवण्यासाठी लक्ष देण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे आता महामार्गावरील पथदिव्यांचे लुकलुकणार दिवे बंद होऊन एलईडीचा लख्ख प्रकाश कधी पडणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.