निवडणुकीसाठी छोट्या १३ पक्षांची मोट

नवी मुंबईत चार प्रमुख पक्ष सक्रिय आहेत. मनसेने विधानसभा निवडणुकीपासून जोर धरला आहे असून भाजपाबरोबर युती करण्याचा प्रयत्ना करीत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

नवी मुंबईत विकास आघाडीची स्थापना

नवी मुंबई : नवी मुंबई पालिका निवणुकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत असताना शेकाप, फॉरवार्ड ब्लाक यांसारख्या छोट्या पक्षांची एक नवी मुंबई विकास आघाडी स्थापन केली जाणार असून गुुरुवारी या आघाडीतील घटक पक्षांची यादी जाहीर केली जाणार आहे. नवी मुंबईत एकूण १११ प्रभाग असून या महिना अखेर आचारसंहिता लागण्याची शक्यता असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात मतदान होणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.

नवी मुंबईत चार प्रमुख पक्ष सक्रिय आहेत. मनसेने विधानसभा निवडणुकीपासून जोर धरला आहे असून भाजपाबरोबर युती करण्याचा प्रयत्ना करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा ही लढत स्पष्ट आहे. ऐनवेळी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्यास हे सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या महाविकास आघाडी व भाजपाला टक्कर देण्यासाठी शेकाप, आप, फॉरवर्ड ब्लाक, एमआयएम, डेमॉक्रटिक फ्रंट, जनता दल, लोकदल, लोकतांत्रिक दल समाजवादी, अशा १३ पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्ना केला जात असून हे पक्ष नवी मुंबई विकास आघाडी या नावाखाली निवडणूक लढविणार आहेत. देशात अडीच हजार नोंदणीकृत पक्ष असून आठ राष्ट्रीय तर ५२ राज्य स्तरीय पक्ष आहेत. शिक्षा, आरोग्य, आणि प्रकल्पग्रस्त तसेच टोल माफी असे मुद्दे घेऊन हे पक्ष निवडणूक रिंगणात उतरत आहेत.

माजी नगरसेविका  सुरेखा नरबागे स्वगृही

नवी मुंबई : काही दिवसांपूवीर्च शिवसेनेत गेलेल्या बेलापूरच्या माजी नगरसेविका सुरेखा नरबागे, त्यांचे पती अशोक नरबागे यांनी त्यांच्या कार्यकत्र्यांसह स्वगृही भाजपात प्रवेश केला आहे. आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नरबागे यांचे भाजपात स्वागत करण्यात  आले. यावेळी माजी आमदार  संदीप नाईक, माजी महापौर  जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, आदी मान्यवर उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Navi mumbai nmmc election bjp shivesna congress ncp akp