केंद्र सरकारच्या “स्वच्छ भारत मिशन” अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२१-२२” मध्ये नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय पातळीवर क्रमांक निश्चित आहे. गेल्यावर्षी देशातील चौथ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून पालिकेला गौरविण्यात आले होते. सातत्याने स्वच्छ शहर सर्वेक्षणात आपला ठसा उमटवणाऱ्या नवी मुंबई शहराला कोणता क्रमांक मिळणार याविषयी तमाम नवी मुंबईकरांमध्ये उत्साह आहे.त्यामुळे १ ऑक्टोंबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपतीच्या हस्ते होणाऱ्या बक्षीस वितरणात नवी मुंबई महापालिकेला कोणता क्रमांक मिळणार याची उत्सुकता व कुतूहल नागरीकांमध्ये निर्माण झाले आहे. या बक्षीस वितरण समारंभाचे आमंत्रणही महापालिकेला प्राप्त झाले असून ज्यांच्या काळात स्वच्छतेते काम वेगात झाले त्याचे प्रमुख अभिजीत बांगर यांची बदली ठाणे पालिका आयुक्तपदी झाली असली तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती अभिजीत बांगर यांनी लोकसत्ताला दिली.

हेही वाचा- २४ महिन्यांचे घरभाडे चक्क २० लाख ५०,००० रुपये! कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याचा कारनामा

अमृत शहरांच्या प्रवर्गात सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने पहिल्या १० क्रमांकाच्या शहरांमध्ये अनेक वेळा स्थान मिळवले आहे. गतवर्षी नवी मुंबई देशातील चौथ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी कोणता क्रमांक मिळणार याबाबत तमाम नवी मुंबईकरांना उत्सुकता लागली आहे. नवव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर त्यानंतर चौथ्या क्रमांकावर त्यामुळे आता कोणता क्रमांक मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.महाराष्ट्र राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापासून कायम नवी मुंबई पालिकेला सातत्याने यश प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून व पुढे स्वच्छ भारत मिशन सुरू झाल्यानंतरही नवी मुंबई महानगरपालिकेने आपले स्वच्छतेचे मानांकन सतत उंचावत ठेवले आहे. राज्यात सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान, नागरिक प्रतिसाद, स्टार रेटिंगच्या निकषानुसार नवी मुंबई महानगरपालिका थ्री स्टार रेटिंगची मानकरी ठरली असून हागणदारीमुक्त शहरामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेस ओडीएफ डबल प्लस रेंटिंग प्राप्त झाले होते.

हेही वाचा- प्रशासनात मोठा खांदेपालट; ठाणे आयुक्तपदी अभिजीत बांगर, नवी मुंबई आयुक्तपदी नार्वेकर

स्वच्छतेबरोबरच स्वच्छतेचा अमृत महोत्सव अंतर्गत इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन केले होते. या उपक्रमामध्येही पालिकेने नवविध संकल्पना राबवल्या असून ४० हजारापेक्षा जास्त युवकांचा प्रतिसाद होता. अशा प्रकारे सातत्याने अनेक वर्ष देशपातळीवर स्वच्छ शहर स्पर्धेत आपले यश टिकवून ठेवलेल्या नवी मुंबई महापालिकेला यंदाही चांगले यश मिळणार असल्याचा विश्वास नागरीकांना आहे. कोणतेही यश संपादन करताना त्यामध्ये सांघिक भावनेचा मोठा सहभाग असतो त्यामुळे शहर स्वच्छतेकरिता सर्व लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी – कर्मचारी, सफाई कामगार तसेच नागरिकांनी एकात्मिक भावनेने दिलेल्या सक्रीय योगदानामुळेच नवी मुंबई महानगरपालिका नेहमी पुरस्कार प्राप्त करीत आहे.त्यामुळे यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१-२२ मध्ये देशात पहिल्या तीन क्रमांकात नवी मुंबई शहर असेल असा विश्वास आहे.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छता अभियानाअंतर्गत विविध नाविण्यापूर्ण गोष्टी केल्या आहेत. शहराला फ्लेमिंगो सिटीची संकल्पना त्यासाठी विविध ठिकाणी केलेल सुशोभीकरण व फ्लेमिंगो प्रतिकृती याची कलात्मक आकणी व मांडणी शहरभर केली आहे.तर शहराचे फक्त चौक देखणे नाहीत तर शहराच्या भिंतीही आकर्षक व बोलक्या झाल्या आहेत. त्यात महाराष्ट्र संस्कृती,कला, भाषा या सर्वांना प्राधान्य दिले आहे.त्यामुळे अनेक वर्षापासून घेतलेल्या परिश्रमाचे फळ यावर्षी नक्की मोठे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निश्चय केला नंबर पहिला हे सत्यात आल्यास नवी मुंबईला मोठा नावलौकीक प्राप्त होणार आहे. त्यामुळे दिल्लीतील कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईतही रविवारपासून रिक्षा प्रवास महागणार

नवी मुंबई शहरात स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध संकल्पना राबवण्यात आल्या. प्रत्येक नवी मुंबईकर नागरिक या स्पर्धेत आपल्यापरिने शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न करत होता. त्यामुळे देशात स्वच्छतेच्या बाबतीत नावलौकीक, परंपरा निर्माण करणाऱ्या नवी मुंबईला उत्कृष्ट क्रमांक मिळेल याचा विश्वास आहे, असे मत नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.

कोणता नंबर मिळणार याची उत्सुकता शिगेला……..

स्वच्छता अभियान व स्वच्छता लीग यामध्ये पालिकेची कामगिरी चांगली झाली असून आता कोणता क्रमांक मिळणार याविषयीची नवी मुंबईकर उत्सुक आहेत