वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. यात अजून काही आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींनी सात ते आठ विद्यार्थाची  ३ कोटी ३० लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.आरोपींना २० तारखे पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भांबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सौरभ शुक्ला, लव गुप्ता, अकिब अहेमद, इफ्तेखार मुश्ताक उर्फ अभय सिंग उर्फ गौतम, अभिजात्य सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो म्हणून ३३ लाख ५० हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात  विनोदनी राजेंद्र यादव, या छत्तीसगढ़ येथील महिलेने केली होती त्यांची मुलगी साक्षी हिला डॉ. डी. वाय. पाटील – मेडिकल युनिवर्सिटी, नेरूळ, नवी मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो म्हणून डोनेशनच्या नावाखाली रुपये ३३लाख ५० हजार असे स्विकाले होते मात्र प्रवेश मिळवून दिला नव्हता. डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल युनिवर्सिटीचे बनावट प्रवेश पत्र देत करण्यात आली होती. आरोपी कडून लॅपटॉप, मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचा >>> नवी मुंबई शहराची ओळख असणारा मिनी सिशोर बनतोय अश्लील चाळे करणाऱ्यांचे ठिकाण, पोलीसांसाठी मोठे आव्हान

या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत, पोलीस निरीक्षक  संजय चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक सविन ढगे व सत्यवान बिले यांनी पोलीस पथकाच्या मदतीने तांत्रिक तपासाच्या मदतीने गुन्हयातील पाहिजे आरोपी यांच्याबाबत माहिती प्राप्त करून त्यांना वाशी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेवुन अटक केलेली आहे.

गुन्हे पद्धत

वैदयकीय प्रवेश प्रक्रीयेसाठी असलेल्या NEET  (नीट) परीक्षा दिलेल्या विदयार्थ्याचा डाटा घेवुन सदर त्यातील विदयार्थी व त्यांचे पालकांना फोनद्वारे संपर्क साधुन महाराष्ट्रातील नामांकीत असे  रॉट वैदयकीय महाविद्यालय (सर जेजे), मुंबई, सायन वैदयकीय महाविदयालय, सायन, मुंबई , गायर वैदयकीय महाविद्यालय, मुंबई , अलीबाग शासकीय वैदयकीय महाविदयालय, अलीबाग, जिल्हा रायगड , डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविदयालय, नेरूळ, नवी मुंबई , तेरणा वैदयकीय महाविदयालय, नेरुळ, नवी मुंबई , एमजीएम वैदयकीय महाविदयालय, कामोठे, नवी मुंबई व इतर वैदयकीय महाविदयालय येथे प्रवेश मिळवून देतो असे आमिष दाखवले जात होते. शिवाय त्या विद्यार्थांना महाविदयालयात घेवुन जावुन वर नमुद महाविदयालयाचे बनावट लेटर हेडवर महाविद्यालयाचा  बनावट शिक्का तयार करून त्याचा वापर करून वैदयकीय प्रवेशाची खोटी कागदपत्रे देतात तसेच कॉलेजच्या नावाची बनावट ईमेल आयडी तयार करून त्यादवारे विदयार्थी व पालकांना ईमेल पाठवले जात होते. यापोटी  विदयार्थी व पालकांकडुन त्यांचे विविध बँक खात्यामध्ये व रोख रक्कम स्वरुपात प्रवेशासाठी ठरलेली रक्कम घेवुन फसवणुक केली जात होती

अटक आरोपी यांचा यापूर्वीचा गुन्हे अभिलेख खालील प्रमाणे

आरोपी सौरभ कृष्णा उपाध्याय- हजरतगंज पोलीस स्टेशन,  पीजीआय पोलीस स्टेशन, कोतवाली पोलीस स्टेशन, बिसलपुर पोलीस स्टेशन,सर्व उत्तरप्रदेश

इफ्तेखार अहमद मुस्ताक अहमद उर्फ अभय सिंग उर्फ गौतम , कामोठे पोलीस स्टेशन,

आरोपी लवकुमार अवधकिशोर गुप्ता – वाव पोलीस स्टेशन,भरूच सिटी,वनसदा पोलीस स्टेशन, सर्व गुजरात ,कासा पोलीस स्टेशन, पालघर, सायन पोलीस स्टेशन,या ठिकाणी फसवणूक बाबत गुन्हे दाखल आहेत.

एसआयटीची स्थापना

नवी मुंबईतील  विविध महाविद्यालयात कोट्यातील प्रवेश मिळवून देतो म्हणून दर वर्षी कोट्यावधी रुपयांची शेकडो विद्यार्थांची फसवणूक होते. फार क्वचित आरोपी सापडतात मात्र रक्कम वसुली होत नाही. याही प्रकरणात आरोपी सापडले मात्र त्यांच्या बँक खात्यात काहीही शिल्लक नाही. त्यामुळे आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) ची स्थापना करून अशा आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील अशी माहिती आयुक्त भांबरे यांनी दिली.