नवी मुंबई: रबाळे पोलिसांनी साखळी चोरी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने फर्माविली आहे. आरोपीचा माग काढण्यासाठी घणसोलीतील घटनास्थळ ते मुंबईतील छेडा नाका या मार्गावरील १४० सीसीटीव्हीची पाहणी करून आरोपींना जेरबंद केले आहे.

२४ तारखेला घणसोलीतील तळवली गावातील महानगर पालिका शाळेच्या प्रवेशद्वार समोर जेंसीबाई नाडार हि चाळीस वर्षीय महिला आपल्या पाल्याला शाळेत सोडून थांबली होती. पाल्य शाळेच्या आत गेल्या नंतर ती परत घरी निघताना दुचाकीवर आलेल्या दोन युवकांनी त्यांना अडवले. आणि मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील ९१ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला.

संशयित घाईने जोरात पळून जाताना मंगळसूत्राचा तुटलेला काही भाग तिथेच पडला होता. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण पाटील यांनी पोलीस निरीक्षक सचिन गवळी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक निर्मिती केली. या तपास पथकाने तळवली येथील महागणार पालिका शाळा प्रवेश द्वार परिसरातील सीसीटीव्ही पाहणी केली असता सीसीटीव्ही मध्ये संशयित आरोपीं आढळून आले.

सीसीटीव्ही द्वारेच त्यांचा माग काढताना जवळपास १५० पेक्षा अधिक तासांचे १४० सीसीटीव्हीचे फुटेल तपासणी करण्यात आली. त्यावेळी संशयित तळवली ते छेडा नगर पर्यंत सीसीटीव्ही पाहणी केल्यावर संशयित छेडा नगर भागातील असल्याची माहिती समोर आली.त्या अनुशंघाने खबरींनी अलर्ट केल्यावर संशयित त्यातील एक संशयित आरोपी हा नेरुळ येथील राहणारा असून आयुष्य देटके असे त्याचा नाव आल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली.

त्याला अटक केल्या त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर अन्य दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यावर चार दिवसांची पोलीस कोठडी फर्माविण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान आरोपींनी अन्य दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. रबाळे पोलीस ठाणे क्षेत्रात गेल्या काही दिवसात साखळी चोरी करताना अचानक दुचाकीवर जवळ येऊन गळ्यातील साखळी हिसकावून पोबारा करणे पद्धती पेक्षा वेगळी पद्धत वापरली जात आहे.

यात सावज हेरून थेट त्याच्या जवळ जाऊन चाकू सारख्या शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या कडील किमती ऐवज काढून घेतला जात आहे. घणसोलीतील एका सोसायटीत गाडी पार्क करताना एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी अशाच पद्धतीने चोरी झाली होती. त्यामुळे या आरोपींच्या अटकेतून अजून काही गुन्हे उकल होऊ शकते अशी आशा पोलिसांना आहे.