नवी मुंबई: नवी मुंबईत विविध ठिकाणी बोलण्यात गुंगवून , थापा मारून त्यांच्या कडील किमती चीज वस्तू हातचलाखीने काढून घेण्याचे अनेक प्रकार घडत आहेत. अशाच पद्धतीने एका जेष्ठ नागरिक महिलेस बोलण्यात गुंतवून तिच्या कंदील १ लाख ५४ हजार रुपयांची ११ टोळ्यांची सोनसाखळी चोरी झाली होती. मात्र पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत या प्रकरणी तिन जेरबंद केले आहे.

त्यांच्या कडून अशाच पद्धतीने केलेले अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक विठ्ठल काळे (वय २२) विष्णू शिवाजी पवार (वय २७) वर्षे , लखन उर्फ कार्तिक दारासिंग काळे (वय १९) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. २४ डिसेंबरला दुपारी बाराच्या सुमारास ५९ वर्षीय अनुसया शिंदे या आपले काम करून ऐरोली परिसरातून घरी पायी जात असताना संशयित आरोपींनी त्यांना गाठले.

आमच्या सेठला मुलगा झाला आहे. या आनंदात ते महिलांना साडी वापर करीत आहे . तुम्हाला साडी हवी असेल तर तुम्हीही जा असे आमिष दाखवले. दुर्दैवाने या आमिषाला बळी पडून अनुसया या साडी घेण्यासाठी जात असताना संशयित आरोपींनी त्यांना पुन्हा अडवत सेठ केवळ गरिबांना साड्या देत असून तुमच्या गळ्यात तर सोनसाखळी आहे. तुम्ही सोनसाखळी काढून पर्स मध्ये ठेवा असा सल्ला संशयित आरोपींनी दिला.

अनुसया यांना हि गोष्ट पटल्याने त्यांनी सोनसाखळी काढून पर्स मध्ये ठेवत असताना त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने आरोपींनी हातचलाखी करून हि सोनसाखळी स्वतःकडे ठेवली. अनुसया यांच्या लक्षात हि बाब न आल्याने त्या संशयित आरोपींनी दाखवलेल्या ठिकाणी निघून गेल्या. पुढे गेल्यावर कुठलाही सेठ साडी वाटत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांनी सोनसाखळी पाहणी केली तेव्हा सोनसाखळी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी त्याच दिवशी त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात, पोलीस हवालदार दर्शन कटके,मयूर सोनवणे, पोलीस नाईक , गणेश वीर , धनाजी भांगरे पोलीस शिपाई यादवराव घुले आणि मनोज देडे यांचे पथक स्थापन करीत तपास सुरु केला.

या पथकाने गुन्हयाच्या अनुशंगाने घटनास्थळाचे निरीक्षण करून घटनास्थळा असणारे सीसीटीव्ही कॅमेरे पाहून तसेच तांत्रिक विश्लेषण वरून आरोपींची माहिती मिळवली. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. दरम्यान आरोपी हे कोपरखैरणे भागात असल्याची माहिती मिळताच तपास पथकाने शोध मोहीम घेत सर्वांना ताब्यात घेत अटक केली. आरोपींनी या पूर्वी केलेल्या तीन गुन्ह्यांची उकल झाली असून अशाच गुन्हे पद्धतीने त्यांनी यापूर्वी गुजरात, मुंबई आणि ठाण्यात गुन्हा केला आहे.