Women’s World Cup 2025 Final Cricket -नेरूळ येथील डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियमवर दुपारी सुरू होणाऱ्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट असून शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी नेरूळ परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.
मागील काही दिवसापासून नवी मुंबई शहरात ऊन पावसाचा खेळ सुरू असून काही तासानंतर सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वीच पावसाचा श्री गणेशा झाला आहे. नवी मुंबईत होत असलेल्या एक दिवसीय अंतिम सांगण्यासाठी क्रीडा रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे नेरूळ येथील डॉक्टर डी वाय पाटील परिसरात सकाळपासूनच क्रीडा रसिकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु नुकतीच पावसाला सुरुवात झाली आहे. स्टेडियम परिसरात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा बरोबरच सायन पनवेल महामार्गाच्या सर्विस रोड परिसराकडूनही प्रवेश दिला जात आहे. या भागात प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली असून पावसाने ही सुरुवात केली असल्याने अंतिम सामन्यावर पावसाचे संकट कायम आहे.
महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी क्रीडा रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. परंतु सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्यामुळे अंतिम सामन्यातही पावसाचे विघ्न राहणार की अंतिम सामना खेळवला जाणार याविषयी क्रीडा रसिकांमध्ये उत्सुकता आहे. नवी मुंबईत होत असलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लाखो क्रीडा रसिकांचे लक्ष लागले असून नेरूळ परिसरात पावसाला सुरुवात झाली असली तरी ऊन पावसाचा खेळ मात्र सामना सुरू होण्यापूर्वीच पाहायला मिळत आहे.
