scorecardresearch

स्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१- २२ मध्ये नवी मुंबई शहर देशात तिसऱ्या स्थानी आली आहे .

स्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी
स्वच्छतेत नवी मुंबई देशात तिसरी

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२१- २२ मध्ये नवी मुंबई शहर देशात तिसऱ्या स्थानी आली आहे . केंद्र सरकारच्या वतीने नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात नवी मुंबई महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले आहे. तर सालाबाद प्रमाणे यंदाही इंदोर पहिला स्थानावर असून सुरत शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. कचरामुक्त शहराचे ‘फाईव्ह स्टार’ मानांकन व ओडीएफ कॅटेगरीमध्ये ‘वॉटरप्लस’ मानांकन मिळविणारे नवी मुंबई हे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर ठरले आहे.

हेही वाचा >>> तळोजात हे चाललंय तरी काय? कारखानदारांकडून घेतला जातोय जल प्रदूषण करणाऱ्यांचा शोध

यंदा नवी मुंबई महानगरपालिकेने शहर स्वच्छते बरोबरच कचरा वर्गीकरण त्याची जनजागृती करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुणांना एकत्र आणून त्यांच्या तर्फे नवी मुंबई शहरात कचरा वर्गीकरणाचा संदेश देण्यात आला. तसेच प्रक्रियायुक्त सांडपाण्याचा पुनर्वापर हा उपक्रम ही यशस्वी द्या राबविण्यात आला आहे. यावर्षी नागरिकांचा सहभाग आणि अभिप्राय याला सर्वाधिक ४०% गुणांकन होते. या स्वच्छता सर्वेक्षणात ७ हजार ५०० गुणांकन होते. शहराच्या व्यवस्था विषयी प्रमाणपत्राला ३०% गुणांकन , पर्यवेक्षक निरीक्षण , पालिका पुरवत असलेल्या सोयी- सुविधा याला ३० % तर उपलब्ध व्यवस्थेवर नागरिकांचा सहभाग आणि अभिप्राय याला ४०% असे गुणांकन होते . त्यामुळे अधिकाधिक नागरिकांचा अभिप्राय आणि सहभाग वाढवण्यावर विशेष लक्ष दिले गेले. त्यामुळेच नवी मुंबई शहराने स्वच्छता अभियानात देशात तिसरे तर राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे . नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते माजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाबासाहेब राजाळे उपस्थित होते

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या