नवी मुंबई: सानपाडा गस्त पोलिसांच्या सतर्कतेने अमली पदार्थ असणाऱ्या हेरोइल वितरण करण्याऱ्या महिलेस अटक करण्यात यश आले आहे. तिच्या कडून १८ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे ३७.६५ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून न्यायाल्याने तिला सहा तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

फातिमा अल्लाउद्दीन शेख (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती वडाळा येथील बुद्धमंदिर समोरील घर क्रमांक ८, एफ ४७ येथे राहते.२८ फेब्रुवारीला संध्याकाळी सव्वाआठच्या सुमारास सानपाडा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय धारेराव, पोलीस हवालदार संतोष बडे, सुनिल चव्हाण, राहुल सुर्यवंशी, 1 संदीप पवार,पोलीस शिपाई गणेशकुमार करवर हे पथक गस्त घालत होते.

त्यावेळी सानपाडा रेल्वे स्टेशन समोरील बस डेपोच्या गेट जवळ एक महिला संशयास्पद हालचाली करीत असताना आढळून आली , पोलीस पथकाने तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिचे नाव फातिमा अल्लाउद्दीन शेख असे समोर आले. तिच्या पर्सची झडती घेतली असता अंमली पदार्थ सदृश्य वस्तु मिळुन आली. रात्रीची वेळ असल्याने तसेच महिला असल्याने तिच्याकडे चौकशी व तिची झडती घेता येत नव्हती.

त्यामुळे राजपत्रित अधिकारी म्हणुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे व महिला पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक सविता कटके यांनी समक्ष उपस्थित राहुन दोन पंचांच्या समक्ष तिची झडती घेतली असता, तिच्या ताब्यातुन हेरॉईन हा अमली पदार्थ मिळून आला त्याचे वजन केले असता ३७.६५ ग्रॅम भरले. तसेच त्याचे बाजार मूल्य १८ लाख ९२ हजार ५०० आहे. अंमली पदार्थ याची फॉरेन्सिक व्हॅनवरील तज्ञांनी तपासणी करुन तो हेरॉईन असल्याचा अहवाल दिला देण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान संपुर्ण कायदेशीर बाबींची पुर्तता करुन आरोपीत महिलेच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायदा कलम प्रमाणे १ मार्चला पहाटे चारच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीत महिलेच्या ताब्यातुन ३७, ६७ ग्रॅम हेरॉईन आणि २ हजार ७३० रुपयांचा मी मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

संशयित आरोपीत महिलेस सुर्यास्तानंतर ताब्यात घेण्यात आलेले असल्याने गुन्हयात अटक करणेकामी मा. न्यायालयाच्या समक्ष हजर करुन अटकेची परवानगी घेवुन १ तारखेला सकाळी ६ वाजता अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने संशयित आरोपीत महिलेला ६ तारखे पर्यंत पॉपलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अंमली पदार्थ कुठुन आणला व कोणाला विक्री करणार होती याबाबत सानपाडा पोलीस ठाणेकडील पोलीस तपास करत आहेत.

हि कारवाई पोलीस उपायुक्त पंकज डहाणे,सहाय्यक आयुक्त आदिनाथ बुधवंत, यांच्या मार्गदर्शनाखाली सानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता कटके, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय धारेराव, पोलीस हवालदार संतोष बडे, सुनिल चव्हाण, राहुल सुर्यवंशी, संदीप पवार, पोलीस निरीक्षक गणेशकुमार करवर, मालुंजकर यांनी केलेली आहे.