सहा वर्षाच्या मुलाला खासगी व्हिडिओ शूट करण्यास सांगितल्याप्रकरणी उरण पोलिसांनी २५ वर्षीय महिला आणि तिच्या ३५ वर्षीय प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. पनवेल सत्र न्यायालयाने पोलिसांना तसे निर्देश दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने तिच्या प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. खटल्यादरम्यान पुरावा म्हणून व्हिडीओ न्यायालयात सादर करण्यात आला. हा व्हिडीओ तिसऱ्या व्यक्तीने शूट केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. याबाबत महिलेला विचारले असता हा व्हिडिओ तिच्या मुलाने शूट केला असल्याचं तिने सांगितलं. चौकशी केली असता, मुलाने सांगितले की, त्याने त्याच्या ‘काकांच्या’ (सहआरोपी) सांगण्यावरून असे केले होते.”

wife with two men in UP hotel
पत्नीला दोन पुरुषांसह हॉटेल रुमच्या बाथरुममध्ये पकडलं; पतीनं तिघांनाही झोडलं, Video व्हायरल
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Panvel mnc, cricket training center ,
पनवेल महापालिकेच्या पहिल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे काम ८० टक्के पूर्ण
couple caught kissing and indulging in obscene act in crowded crut bus in odisha video goes viral
निर्लज्जपणाचा कळस! बसच्या मागच्या सीटवर कपलचे अश्लील चाळे; प्रवाशांसमोर केले असे काही घाणेरडे कृत्य की….; VIDEO झाला व्हायरल
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…

हेही वाचा >> अकरावीच्या विद्यार्थिनीचे वडिलांच्या मित्रासोबत पलायन; अपहरणकर्त्याला गोंदियातून अटक

“एका अल्पवयीन मुलाने दोन अश्लील व्हिडीओ काढल्याचे कळताच न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले, त्यानंतर उरण पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला”, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

हेही वाचा >> प्रियकराची लग्नास ना; अन्य युवकांसोबत लग्न करण्यास मनाई, यामुळे तरुणीने…

पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल

महिलेच्या पतीने तिला आणि तिच्या मुलाला जवळपास सहा महिन्यांपूर्वी सोडून दिले होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोस्को कायदा आहे काय?

प्रत्येक टप्प्यावर बालकांच्या हिताचे संरक्षण करून लैंगिक छळ आणि पोर्नोग्राफी अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी मजबूत कायदेशीर चौकट पुरवण्याकरता लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ तयार करण्यात आला. या कायद्यानुसार किमान शिक्षा दहा वर्षे तर कमाल जन्मठेपेची (प्रसंगी फाशी) तरतूद करण्यात आली आहे .या कायद्यात जामीन मिळणेही मुश्किल आहे. शिवाय जलदगती न्यायालयात खटला चालविला जात असल्यामुळे आरोपीला शिक्षा होऊन या कायद्याची जरब निर्माण झाली आहे.