सार्वजनिक परिवहन क्षेत्रातील नवीन उपक्रमांबद्दल गौरव

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाला आयटीएस क्षेत्रातील राष्ट्रीय सार्वजनिक परिवहन पुरस्काराने गौरविण्यात आले. सार्वजनिक परिवहन क्षेत्रातील नवीन उपक्रमांना नवी दिल्ली येथील मानेकशॉ सेंटरमध्ये ११ ऑगस्ट रोजी गौरवण्यात आले. त्यात नवी मुंबई परिवहनचाही समावेश होता. दुसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शन कार्यक्रम प्रसंगी केंद्र सरकारच्या परिवहन महामार्ग मंत्रालय विभागाचे प्रधान सचिव युधवीरसिंग मलिक व आदी मान्यवरांच्या हस्ते एनएमएमटीला गौरविण्यात आले.

political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
Vijay Bhatkar
डॉ. विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

देशातील सार्वजनिक परिवहन क्षेत्रातील नागरी विभागातील लहान उपक्रम गटात अत्याधुनिक दर्जाच्या वाहूतक प्रणालीचा प्रभावी वापर केल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास २०१७ करिता सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाने अत्याधुनिक दर्जाच्या वाहतूकप्रणाली अंतर्गत तीन बस आगार व बारा  नियंत्रण कक्षांचे संपूर्ण संगणकीकरण केले आहे. सीबीडी-बेलापूर येथील मुख्यालयात अत्याधुनिक व सुसज्ज मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची उभारणी केली आहे. मध्यवर्ती नियंत्रण कक्षास तीन बस आगार व १२ नियंत्रण कक्ष जोडण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत संपूर्ण वाहतुकीचे दैनंदिन कामकाज ऑनलाइन करण्यात येत आहे. शहरातील बस स्थानके व प्रमुख बस थांब्यांवर एलईडी टीव्ही बसवण्यात आले आहेत. त्याद्वारे प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात येते. तसेच निवडक बसस्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. एनएमएमटी ट्रॅकर हे स्वतंत्र मोबाइल अ‍ॅप कार्यान्वित असून त्याद्वारे प्रवाशांना बसच्या अचूक वेळेची माहिती, येणारी बस कोणत्या बस थांब्यावर आहे हे जाणून घेता येते. व्हॉट्सअ‍ॅप आणि एसएमएसद्वारेही बस मार्गाची माहिती मिळवता येते. शिवाय बस आगमनाच्या अलार्मचीही सुविधा आहे.

पुढील दोन महिन्यांत या मोबाइल अ‍ॅप द्वारे तिकीट, पास काढणे, बसमध्ये आसन उपलब्धतेबाबतची माहिती मिळवणे, डिजिटल पेमेंट इत्यादी सुविधा देण्यात येणार आहेत. एनएनएमटी ट्रॅकरमुळे चालक, वाहक व कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवता येणे शक्य आहे. बसचा वेग, प्रवासी थांब्यावर असतानाही बस न थांबविणारे चालक/वाहक इत्यादीची अचूक माहिती परिवहन प्रशासनास मिळणार आहे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका