पालिकेचा अर्थसंकल्प ४०१९ कोटींवर

५६३ कोटींची वाढ

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी सन २०१९-२० च्या जमाखर्चाचे ३४५४ कोटी ७३ लाख ४४ हजारांचे अंदाजपत्रक सादर केले होते. यात स्थायी समितीत १७३ कोटी ८० लाखाची तर सर्वसाधारण सभेत ३९० कोटींची वाढ करण्यात करण्यात आली असून आता ४०२० कोटी १३ लाख ४४ हजार जमा तसेच ४०१९ कोटी २२ लाख ४४ हजार खर्चाचा व ९१ लाख शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.

गेल्या वर्षी तीन हजार १५१ कोटी रुपये जमा आणि तेवढय़ाच खर्चाचे अंदाजपत्रक केले होते. यंदा अनेक उपाययोजनांमुळे हे अंदाजपत्रक ३०० कोटीने वाढले होते. आता यात स्थायी व सर्वसाधारण सभेने ५६३ कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा ८६६ कोटींची यात वाढ झाली आहे.

यामध्ये पाणीपुरवठा, परिवहन उपक्रम, अडथळा मुक्त रस्ते-पदपथ, मलनिस्सारण वाहिनी टाकणे, उद्याने, मैदाने, शाळा, दवाखाने, नागरी विकासकामे, आरोग्य सेवा, समाज मंदिर, नवीन पूल उभारणी, गावठाण विकास, इत्यादी खर्चाच्या बाबींमध्ये ५६३ कोटींची वाढ सुचविली आहे. तसेच संगणकीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा, रुग्णालयीन उपकरणे खरेदी, पुनर्विकास कामे, औद्योगिक क्षेत्र, मेगासिटी परतफेड यामध्ये घट केली आहे.

चर्चेत नगरसेवकांचा सहभाग अल्प

स्थायी व सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पावर गेला आठवडाभर चर्चा करण्यात आली. यात नगरसेवकांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. सभागृहामध्ये निवडून आलेले १११ व पाच स्वीकृत असे एकूण ११६ नगरसेवक आहेत. यापैकी सर्वसाधारण सभेत २९ व स्थायी समितीमध्ये १३ जणांनी चर्चेत सहभाग घेतला होता. उर्वरित सदस्यांनी शब्दही उच्चारला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navi mumbai union budget

ताज्या बातम्या