scorecardresearch

Premium

द्रोणागिरीच्या रस्त्यांवर भर दिवसा पथदिवे सुरू, सिडकोच्या वीज विभागाचा सावळागोंधळ उजेडात

पुन्हा एकदा सिडकोच्या वीज वितरण विभागाचा सावळागोंधळ समोर आला आहे. उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडचा विकास केला जात आहे.

dronagiri road street lights, street lights on at dronagiri road, uran dronagiri road street lights on in daylight
द्रोणागिरीच्या रस्त्यांवर भर दिवसा पथदिवे सुरू (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

उरण : येथील द्रोणागिरी नोडच्या रहिवाशी परिसरातील पथदिवे सोमवारी भर दिवसा सकाळी १०.३० वाजता सुरूच होते. त्यामुळे पुन्हा एकदा सिडकोच्या वीज वितरण विभागाचा सावळागोंधळ समोर आला आहे. उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून द्रोणागिरी नोडचा विकास केला जात आहे. यामध्ये औद्योगिक व रहिवासी अशा दोन्ही प्रकारचा विकास होत आहे.

हेही वाचा : चोरट्याने रिक्षात प्रवास करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

gps loss
GPS ने भरकटवलं, मुसळधार पावसात नदीत बुडाली गाडी; तरुण डॉक्टरांचा करुण अंत
bmc
देवनार मध्ये पालिकेच्या भूखंडाचा विकास; ३०० चौरस फुटाच्या ३३५८ सदनिका उपलब्ध होणार
Uddhav Thackeray group criticized devendra fadnavis
“नागपूर कोणी बुडवले? तुमच्या तथाकथित विकासाचा आज चिखल झाला…” ठाकरे गटाच्या मुखपत्रातून टीका
mumbai rains heavy showers in mumbai area heavy rain In mumbai
मुंबई परिसरात जोरदार सरी

येथील वीज पुरवठा करण्याची जबाबदारी ही सिडकोच्या वीज वितरण विभागाची आहे. मात्र उरण मधील द्रोणागिरीच्या औद्योगिक व नागरी परिसरातील विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. उरणमधील उड्डाणपूल, रस्ते यांवरील पथदिवे रात्रीच्या वेळी नेहमी बंद असतात तर काही ठिकाणी ये-जा करणारी वीज आहे. याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai uran cidco dronagiri road street lights on in daylight neglect from electricity department css

First published on: 25-09-2023 at 12:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×