उरण : द्रोणागिरी नोड व उरण शहराला जोडणाऱ्या बोकडवीरा ते नवीन शेवा उड्डाणपूला वरील पथदिवे बंद असल्याने पुलावर अंधार पसरला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने उभारलेल्या रेल्वे उड्डाणपूलाच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी सिडकोची आहे. मागील अनेक दिवसांपासून या उड्डाणपूलावर खड्डे पडले आहेत. त्यातच आता या पुलावरील पथदिवे ही बंद पडल्याने पुलावर अंधार पसरला आहे. या अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही समस्ये कडे सिडकोच्या विभागाचे  दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरीकांना ही याचा त्रास सहन करावा लागत आहे. या उड्डाणपूला वरील पथदिवे सुरू करून खड्डेही भरावेत अशी मागणी केली जात आहे.

dombivli traffic jam marathi news
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास