‘स्वच्छ भारत मिशन-२०२३ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेले स्वच्छता विषयक उपक्रम जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याकरिता तसेच नागरिकांच्या स्वच्छताविषयक वर्तणुकीमध्ये बदल घडविण्याकरिता माहिती, शिक्षण, प्रसार व जनजागृती अंतर्गत पालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा झाडू सामान्य नागरीक घेऊन स्वच्छता अभियानात सहभाग होत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहेत. २०२२ मध्ये नवी मुंबई शहराला स्वच्छतेत देशात तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान प्राप्त झाला असून ही संपूर्ण नवी मुंबईकर नागरीकांसाठी अभिमानास्पद गोष्ट असताना व शहरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करोडो रुपये खर्चातून नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात रंगरंगोटी करत असताना दुसरीकडे शहरातील अनेक उद्यानांना दिलेल्या महापुरषांच्या नावांकडे मात्र पालिका दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई शहरातील विकासकामे पर्यावरणाच्या मुळावर? पामबीच मार्गावरील सानपाडा भुयारी मार्गासाठी २२४ झाडांचा बळी

trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरातील विविध चौक, रस्ते, ठाणे बेलापूर, सायन पनवेल महामार्ग,अंतर्गत रस्ते व आजूबाजुचा परिसर यांच्या रंगरंगोटीसाठी करोडो रुपये खर्च केले जातात.विवध चौकात मान्यवर कवी यांच्या कवितांच्या ओळी तसेच महाराष्ट्राची संसकृती दाखवणारी बोलकी चित्र नवी मुंबईत आलेल्या प्रत्येकाला आकर्षित करत असतात.नवी मुंबई शहरात विविध आकर्षक अशी उद्याने आहेत. वंडर्स पार्क ,संत गाडगेबाबा उद्यान याच बरोबर दिघा ते बेलापूरपर्यंत शहरात प्रत्यक्षात जवळपास २०० उद्याने विकसित करण्यात आली आहेत. शहरातील या उद्यांनांना नागरीकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. परंतू शहराचे नावलौकीक वाढवणाऱ्या उद्यानांच्या देखभालीकडे अनेकवेळा दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वाशी मिनी शिशोर हा सदैव गजबजलेला परिसर आहे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत याच विभागात अनेक ज्येष्ठ नागरीक तसेच तरुणाई यांची सातत्याने वर्दळ पाहायला मिळते. याच परिसरात माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम यांच्या नावाने उद्याने आहे,संपूर्ण नवी मुंबईच्या रस्त्याच्या कडेच्या भिंती व रिकाम्या भिंतीवर आकर्षक रंगरंगोटी करण्यासाठी करोडो रुपयांचा वापर केला जात असताना महापालिकेच्या उद्यान विभागाला आपल्या शहरातील उद्यांनांवर लिहलेल्या चुकीच्या नावाबद्दल कसलेच सोयरसुतक नाही का असा प्रश्न निर्माण होते.
नवी मुंबई शहरात आकर्षक व देखणी उद्याने हे इतर शहरांना कुतुहलाचा विषय आहे, विभागवार पालिकेने देखणी उद्याने निर्माण केलेली आहेत.

हेही वाचा- नवी मुंबई: २ वाहन चोरांकडून २१ वाहने जप्त; एपीएमसी पोलिसांची कारवाई

एकीकडे उद्यानांना दिलेल्या नामफलक खराब झाले असल्यास त्याकडे उद्यान विभागाचे अजिबातच लक्ष नसते का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. शहरात प्रत्येक उद्यानांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर दिलेली असताना पालिकेच्या एकाही कर्मचाऱ्याला या उद्यानांच्या व अब्दुल कलामांच्या नामफलकात असलेल्या चुकाबाबत किंवा त्याची अक्षरे पडून गेली असल्याबाबत काहीच देणेघेणे नाही का असा प्रश्न निर्माण होतो. पालिकेच्या शहरात अनेक वास्तू आहेत. महापालिका मुख्यालयाच्या इमारतीपासून ते अगदी छोट्या रस्त्याच्या नामफलकाबाबतही पालिकेने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. शहरात जवळजवळ २०० नागरीकांना आकर्षिक करणारी उद्याने असताना त्यांच्या देखभालीकडे योग्य लक्ष् देण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा- चतुर्थ श्रेणी ते उच्च पदस्थ अधिकारी एकत्रित थेट संवाद; पोलीस आयुक्तालयात दरबार अडचणी थेट आयुक्तांच्या समोर मांडण्याची संधी

शहरात दरवर्षी स्वच्छ भारत अभियांना अंतर्गत करोडोंचा खर्च केला जातो. दरवर्षी नव्याने रंगरंगोटी केली जाते. शहराला सातत्याने देशात गौरवले जाते ही चांगली गोष्ट असली तरी पालिकेने ज्या महापुरुषांची नावे ज्या वास्तुला दिली आहेत त्याबाबत तरी काळजी घ्यावी. माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन असलेल्या डॉ.अब्दुल कलामांच्या चुकीच्या नामफलकाबाबत पालिका अधिकारी कधी गंभीर होणार, असे मत वाशीतील नागरीक मंगेश वर्मा यांनी व्यक्त केले.

शहरातील उद्यानांच्या नामफलकाबाबत पालिका योग्य ती काळजी घेईल ,शहरातील विविध वास्तूंना दिलेल्या नावाबाबत चुका आढळल्यास किंवा त्यातील अक्षरे पडली असल्यास त्याबाबत तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली.