लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई: नेरुळ से.२१येथील नवी मुंबई महापालिकेचे रॉक गार्डन सध्या असुविधांच्या विळख्यात असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्याच बरोबर गेले कित्येक वर्षांपासून उद्यानाचा अर्धवट राहीलेला अविकसित भाग कधी विकसित करणारा असा प्रश्न स्थानिक नागरीकांमधून व्यक्त होत आहे. याबाबत नुकतेच रहिवाशांनी आयुक्तांना याबाबत निवेदन देऊन संपूर्ण रॉक गार्डनकडे लक्ष देण्याची मागणी किली आहे.

नेरुळ से.२१ येथील सिद्धिविनायक सोसायटी मधील रहिवासी यांनी या समस्येबाबत पुढाकार घेऊन पालिकेचे आयुक्त आणि उद्यान विभाग यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात रहिवाशी यांनी पाालिकेच्या कार्यायलयाशी सातत्याने गेले ८ वर्ष पत्र व्यवहार करीत असून त्यावर अद्याप कोणतीही पावले उचली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. रॉक गार्डन येथील एकूण क्षेत्रफळापैकी २ एकरचा प्लॉट विकसित करण्यात आलेला नाही. हा विभाग विकसित न केल्याने त्या ठिकाणी जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर नाग, मण्यार आणि फरसे असे विषारी साप मोठ्या प्रमाणात वावरत असून सोसायटी शेजारी असून आम्हाला गेली अनेक वर्षे त्यांचा त्रास होत असून अनेक वेळा सर्प मोठ्या प्रमाणात सोसायटीमध्ये येतात. या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात रानटी बाबुळ झाडे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे सापांना लपण्याची जागा मिळत आहे. या ठिकाणी स्वच्छता होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा साठत असून उंदीर व घुशींचा सुळसुळाट झालेला आहे.

आणखी वाचा- पाडव्याच्या मुहूर्तावर नवी मुंबई पोलीसांकडून सोनसाखळी चोरी प्रकरणातील पिडीत महिलांना दिलासा

संपूर्ण रॉक गार्डनचे नुतनीकरण करणे गरजेचे आहे. सन २०११ मध्ये हे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र आता या उद्यानात विविध वस्तू सोयीसुविधांची पडझड झाली आहे. संपुर्ण वॉकिंग ट्रॅक खराब झालेला आहे. एम्पी थियटीरचा परिसर खराब आहे. गार्डन मधील लहान मुलांसाठी क्रीडा साहित्य नवीन बसविणे. गार्डन मधील पिण्याच्या टाक्या व नळ नवीन बसविणे. गार्डनमध्ये कचरा कुंडी नवीन बसवणे. गार्डनमधील तलाव (पॉड्) दुरुस्त करणे. स्वच्छता गृह, बाथरूम खराब झालेले आहे त्याची नव्याने उभारणी करणे बाबत. सुरक्षा रक्षकांची संख्या वढविणे. सर्व चौकयांची दुरुस्ती करणे. नागरिकांसाठी ४० ते ५० बाक बसवावे. या त्रुटींची त्वरित पूर्तता करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nerul rock garden is inconvenience for people mrj
First published on: 22-03-2023 at 19:07 IST