नवी मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना यंदा परवानगी दिल्याने या वर्षी या मूर्त्यांची संख्या ५० टक्केपर्यंत असणार आहे. यामुळे पालिका प्रशासनाने या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले असून शहरात १३५ असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील दोन वर्षांत करोनामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने निर्बंध घालून साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी पालिका प्रशासनाने शहरात कृत्रिम तलावांचे नियोजन केले होते. जास्तीत जास्त गणेश मूर्तींचे या ठिकाणी विसजर्न करण्यात आले होते. आता निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत असून शासनाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींनाही परवानगी दिली आहे. त्यामुळे या मूर्तींची संख्या या वर्षी वाढणार आहे. या मूर्ती सार्वजनिक विसर्जन तलावात विसर्जित केल्या तर पर्यावरणचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मूर्ती विसर्जनासाठी सार्वजनिक तलाव व कृत्रिम तलावांचे नियोजन केले आहे. शहरात पारंपरिक २२ विसर्जन तलाव आहेत. तसेच १३४ कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. कृत्रिम तलावांत फक्त फ्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी १५१ कृत्रिम विसर्जन स्थळांची निर्मिती करण्यात आली होती. यात वाढ करीत यावर्षी १३४ कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात येणार आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmc to make 34 artificial pond for ganesh immersion zws
First published on: 18-08-2022 at 21:15 IST