नवी मुंबई महानगरपालिकेच्या एन एम एम टी बसला शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजता करळ पुला खालील चौकात अपघात झाला आहे. ही बस उरण ते जुईनगर या मार्गावरील आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र बसचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : झाडांच्या बचावासाठी एमआयडीसी विरोधात मुंडन आंदोलन

Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
seven injured after machinery in trailer
मुंबई नाशिक महामार्गावर ट्रेलर मधील यंत्र वाहनांवर पडून सात जण जखमी
washim, kinhiraja village, accident, Two Wheeler Collides, Truck Two Killed, One Injured, Sambhajinagar Nagpur Highway,
वाशीम : बंद ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण अपघात…. बापलेक जागीच ठार

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात

बस करळ पुलावरून खाली उतरून चौकात वळण घेत असतांना वाहन चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाला. यावेळी बस दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या कंटेनर ला धडकली. त्यामुळे बसचे नुकसान झाले आहे. मात्र हा अपघात झाल्याने करळ परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा- उरण तालुक्यात रस्तोरस्ती कचराभूमी; प्रवाशांना दुर्गंधीतून काढावा लागतो मार्ग

धोकादायक वळण

जेएनपीटीने उभारलेल्या नवीन उड्डाणपुलावरील वळण हे धोकादायक बनले आहे. लांबीने मोठ्या असलेल्या बस किंवा वाहनांना वळण घेतांना अपघात होण्याची शक्यता आहे.