Premium

कोपरखैरणेत विसर्जनानिमित्त अनेक रस्त्यावर नो पार्किंग… 

कोपरखैराणे भागात शेकडो वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केले जात असल्याने या गाड्यांना पर्यायी जागा सुचविण्यात आल्या आहेत.  

No parking many roads occasion Ganesha idol immersion Koparkhairane

नवी मुंबई:  विसर्जन मिरवणूक निमित्ताने वाहतूक विभागाने मुख्य चार रस्त्यांवर विसर्जन दिवशी नो पार्किंग झोन केले आहेत. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. कोपरखैराणे भागात शेकडो वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क केले जात असल्याने या गाड्यांना पर्यायी जागा सुचविण्यात आल्या आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर १९ येथील धारण तलावाचे उत्तम शुशोभीकरण केल्या नंतर गेल्या काही वर्षात या तलावात गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. तलाव परिसर विस्तीर्ण असल्याने गणेश विसर्जन निमित्त येणारी वाहनांना तलावावर अडचण निर्माण होत नाही.

हेही वाचा… नवी मुंबई: माजी नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल  

मात्र तलावापर्यंत पोहचणे आणि तेथून परतण्यासाठी असणारे सर्व रस्ते गर्दीच्या मानाने चिंचोळे ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागाने विसर्जन तलावाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर दोन्ही बाजूंनी नो पार्किंग झोन घोषित केले आहेत. हे नो पार्किंग झोन २३ , २४ , २५ तारखेला दुपारी ०२.०० पासून ते रात्री १२  वाजेपर्यंत तसेच अनंत चतुर्दशी दिनांक २८ रोजी दुपारी १२.०० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीचे सकाळी ०६:०० वाजेपर्यंत गणेश विसर्जन कार्यक्रम संपेपर्यंत नो-पार्किंग” घोषित करण्यात येत आहे.

कुठे कुठे नो पार्किंग

 १) कलश उदयान चौक (बोनकोडे बस स्टॉप) से ११ ते वरिष्ठा चौक से २० कोपरखैरणे. 

२) सिरॉक प्लाझा प्लॉट नं २६.२७.२८ से १९ ते स्मशानभूमी (शंकर मंदिर) खाडी किनारी से १९ सी. कोपरखैरणे.

३) गणेश दर्शन को हौ. सोसायटी प्लॉट नं २३३/२३४ सेक्टर १९ ए. कोपरखैरणे ओम साई कृपा प्लॉट नं २०/२१/३६/३७ सेक्टर १९. कोपरखैरणे काशी नाम प्लॉट नं ३२/३३ सेक्टर २९ ए कोपरखैरणे. सिरॉक प्लाझा प्लॉट नं २६,२७,२८ से १९ ए.नामदेव स्मृती प्लॉट नं २४९ से १९ ए कोपरखैरणे.

४) श्री गणेश विसर्जन तलाव ते गणेश दर्शन को हौ. सोसायटी प्लॉट नं २३३ / २३४ सेक्टर १९ ए. कोपरखैरणे.

५ )गणेश दर्शन को हौ. सोसायटी प्लॉट नं २३३ / २३४ सेक्टर १९ए कोपरखैरणे, ओमसाई कृपा प्लॉट नं २० / २१ / ३६ / ३७ सेक्टर १९ ए कोपरखैरणे. काशी नाम प्लॉट नं ३२ / ३३ सेक्टर १९ ए कोपरखैरणे. सिरॉक प्लाझा प्लॉट नं २६,२७,२८ से १९ ए नामदेव स्मृती प्लॉट न. २४९.

पर्यायी पार्किंग व्यवस्था

१) स्मशानभूमी (शंकर मंदिर) खाडी किनारी से १९ सी, कोपरखैरणे ते भुमीपुत्र मैदान खाड़ी

२) खाडी किनारी जवळी रस्ता सेक्टर २३ कोपरखैरणे. 

या निर्बंधातून  वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही जीवनावश्यक वाहने पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, प्रवासी वाहतुक करणा-या सर्व प्रकारच्या बसेस व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली आहे. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: No parking on many roads on the occasion of ganesha idol immersion in koparkhairane dvr

First published on: 20-09-2023 at 14:23 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा