तुम्ही घर घेतल्यावर त्याची नोंदणी सहनिबंधक कार्यालयात केल्यावरच ते घर तुमच्या नावावर होते. मात्र अनेकदा आज करू उद्या करू म्हणून पुढे ढकलले जाते. ही चूक नवी मुंबईतील कोपरी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला महागात पडली आहे. ज्यांच्या मध्यस्थीने घर घेतले त्यांनीच हे घर अन्य एकाला विकले. या बाबत माहिती मिळताच धावपळ करीत एपीएमसी या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

एपीएमसी पोलीस ठाण्यात चौहान दया शंकर पी आणि संजय मधुकर कोचरेकर या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे हे तपास करीत आहेत. वाशी सेक्टर २६ वाशी येथील महाराष्ट्र को ऑप हौसिंग सोसायटी मधील ८६/०१ हे घर प्रसन्ना कुंजीराम पुजारी यांनी २१ लाख ५० हजार रुपयांत चेतन शहा यांचे घर विकत घेतले. सदरचे घर चेतन शहा यांनी गुन्हा दाखल असलेले आरोपीपैकी चौहान दयाशंकर यांच्याकडून १९९४ मध्ये खरेदी केले होते. मात्र त्याची नोंदणी सहनिबंधक कार्यालयात केली नव्हती. याचा गैर फायदा घेत चौहान दयाशंकर हा सर्व व्यवहार माहिती असूनही संजय मधुकर कोचरेकर यांना विकत त्याची नोंदणी १८ डिसेंबर २०२२ रोजी  सह निबंधक कार्यालयात केली होती.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका

हेही वाचा: नवी मुंबईतील वाशीमध्ये पाणीबाणी; मनपावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की

ज्यावेळी सदर घराचे सध्याचे खरे मालक चेतन शहा यांनी फिर्यादी प्रसन्ना कुंजीर पुजारी यांच्याबरोबर सदर घर २१ लाख ५०हजार रुपयांत विकल्याचा  रीतसर व्यवहार केला  व त्याबाबतची खरेदी विक्री नोंदणी करण्यासाठी ते दोघे सहनिबंधक कार्यालयात गेले असता सदर घर आधीच चौहान यांनी संजय कोचरेकर याला विकल्याची नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले .त्यामुळे चौहान व संजय कोचरेकर यांनी संगनमत करून आपली फसवणूक केल्याप्रकरणी सदर घराचे नवीन खरेदीदार प्रसन्ना कुंजिराम यांनी त्या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास  पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे करत आहेत.