scorecardresearch

हेल्मेटचा बेल्ट न बांधणे पडले महागात, अपघातात मृत्यू

आज साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास नेरुळ उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात १९ वर्षीय अमन इर्शाद अन्सारी याचा याचा मृत्यू झाला.

death 22
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

नवी मुंबई: आज साडेतीन चार वाजण्याच्या सुमारास नेरुळ उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात १९ वर्षीय अमन इर्शाद अन्सारी याचा याचा मृत्यू झाला. दुचाकी घसरल्यावर मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या खाली तो आला होता. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अमन अन्सारी हा वातानुकूलित यंत्राच्या दुरुस्तीचे काम करत असून आज (शनिवार) दुपारी चारच्या सुमारास अमन अन्सारी हा खारघर येथील आपले काम आटोपून मुंबईच्या दिशेने तो आपल्या सहकार्या समवेत  निघाला.  नेरुळ येथील एल पी उड्डाण पुलावर चढताना एका खड्याला चुकवताना त्याच्या गाडीचा तोल गेला व गाडी घसरली. त्यात दोघेही खाली पडले.

वास्तविक अमन याने हेल्मेट घातले होते मात्र त्याचा बेल्ट न लावल्याने तो घसरून पडताच त्याचे हेल्मेट त्याच्या डोक्यावरून निघून खाली पडले तेवढ्यात मागून येणाऱ्या अज्ञात वाहनं त्याच्या वरून गेले आणि तो जागीच गतप्राण झाला. या अपघातास कारण असणारे वाहन निघून गेले. मात्र मागून येणारी वाहने थांबली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. नेरुळ पोलिसांचे अमन अन्सारी याच्या म्रुत्युस कारण असणाऱ्या अज्ञात वाहन चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 22:07 IST
ताज्या बातम्या