Notice to Power Green Company from Municipal Corporation for closure of electric charging station in Navi Mumbai | Loksatta

नवी मुंबई शहरातील इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानक नावापुरते….

पालिकेने प्रायोगिक तत्वावर चार्जिंग स्टेशनची चाचपणीही सुरु केली होती. चार्जिंग स्थानक अद्याप सर्वसामान्यांच्यासाठी सेवेत आले नाही.

नवी मुंबई शहरातील इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानक नावापुरते….
इलेक्ट्रीक चार्जिंग पाॅईंट

एकीकडे महागाईने सामान्य नागरीकांचे हाल होत असताना दुसरीकडे सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीतही होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडत आहे. सर्वसामान्य नागरीकांना पेट्रोल व डिझेलवरील गाड्या वापरणे दिवेंदिवस कठीण जात आहेत. करोनामुळे मागील दोन वर्ष आर्थिक कंबरडे मोडलेल्या नागरीकांना दिलासा देण्यासाठी इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानके सुरु करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. मात्र, कामाच्या दिरंगाईमुळे पॉवर ग्रीड कंपनीला पालिकेने पहिली नोटीस बजावली असून कामाच्या दिंरगाईमुळे कंपनीला दुसरी नोटीस बजावणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- उरणचे प्रवेशद्वार असलेला चारफाटा पुन्हा अंधारात; नागरिकांची गैरसोय

एकीकडे घरगुती गॅसदरामध्येही वाढ होत असताना नागरीकांना सततच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे खिशाला झळ बसत असताना इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय समोर आला आहे. पालिका शहरात एकूण २० चार्जिंग स्थानके उभारणार असून नवी मुंबईतील ज्वेल ऑफ चार्जिंग स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. पण हे चार्जिंग स्थानक फक्त नावापुरते व शोभेपुरते उरले आहे. पालिकेने प्रायोगिक तत्वावर चार्जिंग स्टेशनची चाचपणीही सुरु केली होती. चार्जिंग स्थानक अद्याप सर्वसामान्यांच्यासाठी सेवेत आले नाही. देशभरात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढावा यासाठी केंद्र व राज्य शासन प्रोत्साहन देत आहे.

हेही वाचा- पनवेल : तळोजा येथे एनएमएमटीच्या बसला आग; सुदैवाने जिवितहानी नाही

पर्यावरणाच्यादृष्टीने केंद्राने, राज्याने इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर केले असून इलेक्ट्रीक वाहने खरेदी करण्यासाठी सवलत आहे.पालिकेनेही अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रीक वाहनेच खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.नवी मुंबई महापालिकेने पर्यावरण पूरकतेसाठी फेम २ अंतर्गत शहरात २० चार्जिंग स्थानके उभारण्याचा निर्णय घेतला . पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनही कामात दिरंगाई केल्याने पालिकेने नोटीस बजावली. ज्वेल ऑफ नवी मुबई येथे पहिले चार्जिंग स्थानक प्रत्यक्षात आले असले तरी ते शोभेपुरतेच आहे.शहरात अशी २० चार्जिंग स्थानके असून चार्जिंग स्थानके कागदावरच उरली आहेत.सदर कंपनीला केंद्र शासनाकडून फेम २ अंतर्गत योजनेतून अनुदानही दिले जाणार आहे.आपले वाहन चार्जिंग करण्यासाठी लागणाऱ्या कालावधीत सदर वाहनचालकाला अवधी मिळणारआहे. त्यामुळे वीस चार्जिंग स्थानकात ठेकेदार कंपनीकडूनच कॅफेटेरिया ,वॉशरुम उभारले जाणार आहेत.

प्रत्येक चार्जिंग स्थानकात ६ युनिट उभारले जाणार आहेत. सध्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील चार्जिंग स्थानकात २ युनिट उभारण्यात आले आहेत. वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे आधीच तोट्यात असले परिवहन उपक्रमालाही तोटा होत आहे. केंद्र शासनाच्या फेम १ व फेम २ अंतर्गत परिवहनच्या ताफ्यात १८० बस दाखल झाल्या आहेत. शहरात इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर होण्यासाठी चार्जिंग स्थानकच प्रत्यक्षात अस्तित्वात येत नाही. २० चार्जिंग स्थानके उभारण्याकरिता ३१ मार्च २०२३ ची मुदत दिली असून गेल्या ५ महिन्यात एकही चार्जिंग स्थानक प्रत्यक्षात कार्यरत नसल्याने दुसरी नोटीस बजावून कंपनीसोबत करार रद्द करण्याचा इशारा दिली आहे.

हेही वाचा- दांडिया खेळू देत नाही म्हणून हातोडा डोक्यात घालून हत्या ; आरोपीला अटक ; रबाळे एमआयडीसी भागातील घटना

२० इलेक्ट्रीक चार्जिंग स्थानकासाठी पॉवर ग्रीड या कंपनीला

३१ मार्च २०२२ ला कार्यादेश दिल्यानंतरही ५ महिन्यात एकही चार्जिंग स्थानक कार्यान्वित करण्यात आले नाही. चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी ३१ मार्च २०२३ची मुदत असताना अद्याप चार्जिंग स्टेशन कागदावरच आहे.कंपनीला दुसरी नोटीस बजावली जाणार असून वेळ पडल्यास करारही रद्द करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

पहिल्या टप्प्यात २० चार्जिंग स्थानके उभारण्याचा कार्यादेश – ३१ मार्च २०२२
काम पूर्ण करण्याचा कालावधी- ३१ मार्च २०२०
शहरात उभारवायची चार्जिंग स्थानके- २०
अद्याप कार्यान्वित चार्जिंग स्थानक- ०

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उरणचे प्रवेशद्वार असलेला चारफाटा पुन्हा अंधारात; नागरिकांची गैरसोय

संबंधित बातम्या

तिघा विकासकांविरोधात बलात्काराचा गुन्हा
बांदेकरांच्या‘आदेशा’मुळे शिवसेनेत दुफळी?
नवी मुंबई पालिकेचा करोना उपचार सुविधांवर ३०० कोटींचा खर्च?
बलात्कार प्रकरण : “गणेश नाईक यांना अटक करुन…”; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली माहिती
खारघरमध्ये स्वाइन फ्ल्यूचा रुग्ण, कामोठेत मंकीफॉक्सचा संशयित ; साथीच्या आजारांत वाढ, डेंग्यूचे सहा रुग्ण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“हे अकलेचे कांदे…”, चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला; म्हणाले, “तुमच्या तिजोरीत येणारे पैसे…”
IND vs BAN 3rd ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पुण्यात ५१ पादचारी सिग्नल बसविण्याचा प्रस्ताव धूळ खात
‘विकी डोनर २’बद्दल आयुष्मान खुरानाचा मोठा खुलासा, म्हणाला…
“कथानकाची गरज असेल तर…” स्त्री वेश परिधान करण्याबाबत शरद पोंक्षेंचं स्पष्टीकरण, म्हणाले, “अन्यथा ते हिडीस…”