तुभ्रे वाहतूक शाखेच्या हद्दीत सानपाडा सेक्टर १, १३, १४,१५, १६, १७ मधील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडी हेात आहे.
वाहतूक समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोणातून व नागरिकांच्या सोयीसाठी तुभ्रे वाहतूक शाखेच्या सानपाडा सेक्टर १३ मधील शहा कॉम्प्लेक्स ते गुरू सिमरण हावरे सोसायटी, सेक्टर १४ मधील अकुरथ सोसायटी ते इंद्रायणी स्वीट्सपर्यंत, सेक्टर १ मधील राज उदय सोसायटी परिसर, सेक्टर १४ येथील ओमप्लाझा सोसायटी परिसर, सेक्टर १ मधील शिवालय कॉम्प्लेक्स ते यशवंत टॉवर, सेक्टर १५ मधील शिवशंकर सोसायटी ते भूमिराज कासा सोसायटीपर्यंत, सेक्टर १५ मधील कोयना सोसायटी ते गोरबंध सोसायटी, सेक्टर १४ मधील इंद्रायणी स्वीट ते केशव कुंज सोसायटीपर्यंत, सानपाडा बिजेचे दोन्ही बाजूकडील रस्ता या ठिकाणी सम-विषम पाìकग करणे विभागाकडून प्रस्तावित आहे. मोरोज रेसिडेन्सी, ते गुणिना मौदान, वडार भवन ते सीवुड्स गार्डन, सेक्टर १६ येथील महावितरण सब स्टेशन ते गुणिना मैदानापर्यंत नो पाìकग झोन करण्यात येणार आहे. तरी सदर प्रस्तावाबाबत काही हरकती अगर सूचना असल्यास सीबीडी येथील कोकण भवनमधील सातवा मजलावरील वाहतूक पोलीस उपआयुक्त कार्यालयात समक्ष किंवा लेखी स्वरूपात कळवण्याचे आवाहन उपआयुक्त अरिवद साळवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.