scorecardresearch

नवी मुंबई शहराची ओळख असणारा मिनी सिशोर बनतोय अश्लील चाळे करणाऱ्यांचे ठिकाण, पोलीसांसाठी मोठे आव्हान

झाडीझुडपाचा  आधार घेत याठिकाणी नको ते चाळे सुरु असल्याबद्दल नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई शहराची ओळख असणारा मिनी सिशोर बनतोय अश्लील चाळे करणाऱ्यांचे ठिकाण, पोलीसांसाठी मोठे आव्हान
वाशी हे नवी मुंबईतल मध्यवर्थी ठिकाण आहे. याच परिसरात असलेली चौपाटी मिनी सिशोर म्हणून प्रसिध्द आहे.

नवी मुंबई – नवी मुंबई शहराची ओळख असणारा वाशी येथील मिनी सिशोर हा नवी मुंबईकराच्या आवडीचे व फिरण्याचे ठिकाण.  नवी मुंबई शहरात मध्यवर्ती  असलेल्या  वाशी सेक्टर १० येथील   मिनी सिशोर येथे विविध महोत्सव होतात. याच ठिकाणी सुट्टीच्या व दिवसाबरोबरच सकाळ संध्याकाळ येथे नागरीकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.परंतू मागील काही महिन्यांपासून या ठिकाणाला वेगळेच रुप येऊ लागले आहे. या मिनी शिशोर परिसरात अश्लील चाळे करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरीक याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. जणूकाही त्यामुळे आता पोलीसांसमोर मोठे आव्हान असून याबाबत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस विभागामार्फत देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : द्राक्ष हंगाम सुरू होण्याला महिना लागणार; घाऊक बाजारात द्राक्ष प्रतिकिलो ६०-१००रुपयांवर

वाशी हे नवी मुंबईतल मध्यवर्थी ठिकाण आहे. याच परिसरात असलेली चौपाटी मिनी सिशोर म्हणून प्रसिध्द आहे. याच परिसरात अनेक उद्यानेही आहे. याच मिनी सिशोर परिसरात असलेल्या ट्रॅकवर चालण्यासाठी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत मोठी गर्दी असते. तसेच याच परिसरात असलेल्या विविध उद्यानांमध्ये मुलांना खेळ्यासाठी सोयीसुविधा असल्याने हा परिसर कायम वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जाते. याच विभागात अबालवृध्दांची गर्दी असते.परंतू आता याच चौपाटी परिसरात नवी मुंबई वगळता मानखुर्द ,गौवंडी, तसेच चेंबुर ,घाटला या परिसरातून येणाऱ्यांची संख्या खूप असल्याचे निदर्शनास येत असल्याचे येथील नागरीकांनी सांगीतले. याच मिनी शिशोर परिसरात कठड्यावर बसून  अश्लील चाळे करत असतात. त्यामुळे याविषयी नागरीक पोलीसांकडे तक्रारी करत असून योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरीक करु लागले आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई महापालिकेवर भगवा फडकवणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली – केसरकर

मिनी सिशोरच्या या परिसरात पोलीसांचे पथकही सज्ज असते. परंतू अनेकवेळा  पोलीसांना गुंगारा  देऊन याच परिसरात असलेल्या झाडीझुडपाचा  आधार घेत याठिकाणी नको ते चाळे सुरु असल्याबद्दल नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेतच या परिसरात पूर्ण १.५ किमी जॉगीग ट्रॅकपर्यंत जाता येते अन्यथा दुपारच्या वेळात फक्त बाहेरील परिसरात प्रवेश दिला जात आहे. तरीदेखील या ठिकाणच्या सुरु असलेल्या तरुणाईच्या वर्तनाबाबत पोलीसांनी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी नागरीक करत आहेत.

नवी मुंबईबाहेरुन येणाऱ्या व गैरवर्तन करणाऱ्यांवर पोलीसांनी अधिक कडक कारवाई करण्याची व मिनी सिशोरचे सौंदर्य व सभ्यता टिकून ठेवण्याची मागणी नागरीकांमार्फत करण्यात येत आहे.

नागरिकांची मागणी

सुरवातीला वाशी येथील मिनी सिशोरच्या संपूर्ण ट्रॅकवर चालण्यासाठी वेळेचे बंधन नव्हते. परंतू करोनानंतरच्या काळात येथे बाहेरुन येणाऱ्यांची व चुकीचे प्रकार करणाऱ्यांची संख्या वाढल्याने संपूर्ण शिशोरला प्रवेश न देता फक्त बाहेरील भाग पूर्ण वेळ खुला असतो. चुकीचे प्रकार बंद करुन संपर्ण परिसर पूर्णवेळ नागरीकांसाठी खुला करण्याचीही मागणी नागरीक करत आहेत.

वाशी येथील मिनी सिशोर परिसर अतिशय छान  आहे. परंतू या ठिकाणी  चुकीच्या पध्दतीने जोडपी कृत्य करतात त्याला आळा बसला पाहीजे. लहान मुलांना घेऊन दररोज हजारो पालक येतात. त्यामुळे पोलीसांनी तसेच स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी.

मनिषा इंगळे, स्थानिक नागरीक

नवी मुंबई येथील मिनी सिशोर परिसरात शहराबाहेरुन येणाऱ्या जोडप्यांची संख्या अधिक असल्याचे चित्र आहे. पोलीसांचे पथक येथे गस्त घालून कारवाई करते. न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमानुसार चुकीच्या पध्दतीने वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.

रमेश चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,वाशी पोलीस स्टेशन

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 23:59 IST

संबंधित बातम्या