scorecardresearch

उरण: संविधान दिनानिमित्त घारापुरी बेटावर राबविण्यात आली स्वच्छता मोहीम

घारापुरी बेटावर उरणचे तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

उरण: संविधान दिनानिमित्त घारापुरी बेटावर राबविण्यात आली स्वच्छता मोहीम
उरण: संविधान दिनानिमित्त घारापुरी बेटावर राबविण्यात आली स्वच्छता मोहीम

संविधान दिनानिमित्त घारापुरी बेटाच्या किनाऱ्यावर स्वछता मोहीम राबविण्यात आली. घारापुरी बेटाच्या किनाऱ्यावर चारही बाजूने मोठ्या प्रमाणात समुद्रातून कचरा वाहून येत आहे. त्यामुळे जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या घारापुरी बेटाचे किनारे कचरायुक्त होत आहेत. त्यामुळेच किनारा स्वच्छतेसाठी ही मोहीम राबविण्यात आली.

घारापुरी बेटावर अवघ्या जगभरातून पर्यटक येत असतात. घारापुरी बेटावर उरणचे तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. उरण तालुक्यातील अनेक विभागांचे शासकीय कर्मचारी, एनजीओ, बीआरसी, सीआरसी यांनी या मोहिमेत भाग घेतला होता. उरण तालुक्यात घारापुरी येथे पुरातन लेणी आहेत. येथे फिरायला आल्यावर काही पर्यटक येथे रिकाम्या पाण्याच्या बाटल्या आणि रिकामी खाऊचे पाकीटे फेकून देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. तसेच घारापुरी बेटावर भरती ओहोटीला किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येतो त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पसरतो.

हेही वाचा: नवी मुंबई: संकटमोचक म्हणून धावून आले गणेश नाईक; अपघातग्रस्तांना केली मदत

हा कचरा उचलण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीकडे मोठी यंत्रणा उपलब्ध नसल्याने कचरा संकलनामध्ये अडथळे निर्माण होतात. त्यामुळे घारापुरी बेटावर अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिम राबविण्यात येतात. या मोहिमेत तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी, सर्व ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी, उरण पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमधील कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, एनजीओ,बीआरसी,सीआरसी उरण यांनी सहभाग घेतला होता.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 15:24 IST

संबंधित बातम्या