सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आणि थर्टीफस्ट डिसेंबरचा आनंद घेण्यासाठी सर्वचजण सज्ज आहेत. अनेकांनी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे येथेच्छ खादाडी करण्यासाठी देखील सर्वचण आतुरलेले आहेत. दरम्यान एकीकडे नागरिकांची ही सगळी तयारी झालेली असताना दुसरीकडे मासोळी बाजाराती माशांचा भाव मात्र वधारला असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज नवी मुंबई येथे मच्छी महाग झाली आहे. मच्छीवर मनसोक्त ताव मारुया, पापलेट, सुरमई, बोंबील खरेदी करुया, असा बेत करत असाल तर जरा बाजारात जाऊन एकदा दर बघा.

माशांचे दर २०० ते ३०० रुपयांनी वाढल्याचे दिसेल. पापलेट १५०० ते १८०० रुपये किलो, बोंबील ४०० रुपये, कोळंबी ७०० रुपये, हलवा ८००रुपये ,चिंबोरी दोन हजार, रावस १ हजार तर बांगडाचा भाव ४०० रुपये आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On the occasion of thirty first december the price of fish increased by rs 200 to rs 300 msr
First published on: 31-12-2021 at 13:22 IST