लोकसत्ता टीम

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र, व मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची व इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने बुधवार दिनांक ०७ जून २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा १२ तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी दिवसभर १२ तास नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा बंद राहील.

air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
Pimpri, Leakage in water channel, moshi,
पिंपरी : मोशीत जलवाहिनीला गळती, हजारो लीटर पाणी वाया
water supply has been restored but complaints of water shortage are still continue
पिंपरी : पाणीपुरवठा पूर्ववत, मात्र तक्रारींचा ओघ
only 32 percent water stock left in mumbai dams
Water stock in Mumbai Dams : मुंबईच्या धरणांत केवळ ३२ टक्के पाणी; फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा

तसेच गुरूवार दिनांक ८ जून २०२३ रोजी शहरात सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. त्याअनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी या कालावधीत पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करून नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता,पाणी पुरवठा नवी मुंबई महानगर पालिका यांच्या कडून करण्यात आले आहे.