उरण परिसरातून बेकायदा शस्त्र प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आले. त्याच्या चौकशीतून तो विकी देशमुख या टोळीसाठी काम करीत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विक्रांत भोईर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सुमारे दोन वर्षांपासून उरण परिसरात खंडणी हत्या ,हत्येचा प्रयत्न अशा ३८ गुन्ह्यांची नोंद असलेला विकी देशमुखटोळीच्या मागावर गुन्हे शाखा होती. आता पर्यंत टोळीचा सूत्रधार विकी देशमुख सह १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

त्याच्या विरोधात पाचव्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे. अशातच याच टोळीतील विक्रांत हा पोलिसांच्या हाती लागला आहे. उरण परिसरात एक गुंड येणार असून त्याच्या कडे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती या माहितीच्या आधारावर सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. त्याच्या कडे एक देशी पिस्तूल आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहे. चौकशी दरम्यान तो विकी देशमुख टोळीसाठी काम करीत असल्याचेही समोर आले आहे. काही अपहरण गुन्ह्यात त्याने वाहन चालकाचे काम केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.