scorecardresearch

Premium

नवी मुंबई: बेशिस्त रिक्षा पार्किंग मुळे एकाचा जीव गेला

चुकीची रिक्षा पार्किंग आणि बेजबाबदार एनएमएमटी चालका मुळे एका अल्पवयीन मुलाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेरूळ येथे घडली आहे.

dead body
कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या (प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई : चुकीची रिक्षा पार्किंग आणि बेजबाबदार एनएमएमटी चालका मुळे एका अल्पवयीन मुलाचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेरूळ येथे घडली आहे. या प्रकरणी बस चालक आणि रिक्षाचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अपघातात मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव विवेक पटवा असे असून तो नवी मुंबईतील करावे गावात राहतो. गुरुवारी दुपारी तो दुचाकी वरून नेरूळ जिमखाना सेक्टर २८ येथून जात होता. त्यावेळी रिक्षा क्रमांक एम एच ४३ बी एक्स ०४२९ या रिक्षा चालकाने वाहतूक नियम बाह्य पद्धतीने रिक्षा पार्क केली होती.

त्यावेळी नेमके एका बाजूने एनएमएमटी बस येत असताना विवेक पटवा याची दुचाकी  रिक्षास धडकली आणि विवेक खाली पडला.  खाली पडला नेमक्या त्याच वेळी मागून येणाऱ्या एनएमएमटी(एम एच ४३ बी एक्स ०४२९) बस खाली तो चिरडला गेला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालक आणि बेशिस्त रिक्षा पार्किंग करणाऱ्या रिक्षा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली . 

weight loss tips
बदाम खा आणि झटपट वजन कमी करा; जाणून घ्या बदाम खाण्याचे आणखी फायदे
Jalandhar News
पोलीस वाहनात बनवला अश्लील रील, VIDEO व्हायरल होताच अधिकाऱ्याचं निलंबन; नेमकं काय घडलं वाचा!
camera kit bag half a lakh forgotten rickshaw handed original owner police CCTV
रिक्षात विसरलेला दिड लाखांचा व्हिडीओ कॅमेरा व किट परत मूळ मालकाकडे; सीसीटीव्हीमुळे झाले शक्य 
nashik rickshaw drivers protested a Municipal Corporation's CityLink city bus service
नाशिक: सिटीलिंक बससेवेविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर; रिक्षांअभावी प्रवाशांचे हाल

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One died due to unruly rickshaw parking navi mumbai amy

First published on: 06-04-2023 at 23:58 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×