गणेशोत्सव मिरवणूक, विसर्जनामुळे एपीएमसी कांदा बटाटा बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी बाजारात कांदा- बटाट्याची आवक जास्त येणे अपेक्षित होते. मात्र बटाट्याला वाहतुक कोंडीचा फटका बसला असून बाजारात अवघ्या ४२ गाड्या दाखल झाल्या आहेत. घोडबंदर रोडवर गेल्या कित्येक तासापासून वाहतूक कोंडी असल्याने गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे बाजारात अद्याप ४२ गाड्या दाखल झाल्या आहेत. अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

एपीएमसी बाजार समिती भाजीपाला वगळता इतर बाजार शुक्रवारी अनंत चतुर्दशी निमित्ताने बंद ठेवण्यात आलेले होते. तसेच उद्या रविवारी ही एपीएमसी बंद असते. त्यामुळे आज शनिवारी कांदा- बटाट्याच्या जादा आवक होणे अपेक्षित होते. सणामुळे उत्पादन कमी निघत आहे . त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे . मात्र एक दिवस बाजार बंद राहिल्यास दुसऱ्या दिवशी आवक वाढते. आज मात्र बाजारात कांद्याच्या ६२ गाड्या दाखल झाल्या आहेत.

हेही वाचा : खारकोपर ते उरण रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या कामांना वेग ; मार्गाचे काम जानेवारी २०२३ ला पूर्ण होणार ?

तर काही वाहने वाहतूक कोंडीमध्ये फसल्याने बाजारात बटाट्याच्या केवळ ४२ गाडी दाखल झाल्या आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदा पावसाळ्यात कांद्याचे दर वधारण्याची शक्यता होती, परंतु यावेळी कांद्याचे दर आवाक्यात आहेत, मात्र बटाटा वरचढ ठरत आहे. घाऊक बाजारात कांदा प्रतिकिलो १०रुपये ते १६ रुपयांवर उपलब्ध आहे .याउलट बटाटा प्रतिकिलो १७ रुपये ते २० रुपयांनी विक्री होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याने दिलासा दिला आहे, बटाटा मात्र चढ्या दराने उपलब्ध आहे.