पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रात मालमत्ता कराची चुकीच्या पद्धतीने वसुली होत असल्याने पाच याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.  या करवसुलीवर सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांनी सुट्टय़ांच्या दिवसांमध्ये पालिका प्रशासन वसुलीसाठी सक्ती करण्याची भीती व्यक्त केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने १० जूनपर्यंत पालिकेने सक्ती केल्यास याचिकाकर्ते न्यायालयात सुट्टीच्या न्यायालयात दाद मागू शकतील असे आदेश २५ एप्रिलला दिले आहेत.

 हे आदेश न्यायमूर्ती ए. ए. सय्यद, अभय अहुजा यांच्या खंडपीठाने दिले आहेत.  खारघर कॉलनी फोरम, खारघर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी फेडरेशन, कामोठे कॉलनी फोरम अशा विविध याचिकाकर्त्यांनी एकत्रित मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. . मेअखेपर्यंत थकबाकीदारांकडून दंड आकारणार नाही, मात्र त्यानंतर टप्प्याटप्प्याने कर वसुली केली जाईल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी पालिका सुट्टीच्या काळात दंड वसुलीसाठी सक्ती करू शकते अशी शक्यता न्यायालयात व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.