scorecardresearch

नवी मुंबई : महापालिका मुख्यालयातील विशेष रक्तदान शिबिर; अधिकारी, कर्मचारी यांचे स्वेच्छेने रक्तदान

या रक्तदान शिबिरात ७५ पुरुष व ८ महिलांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयात विविध कामांसाठी भेट देणाऱ्या ४ नागरिकांनीही यामध्ये स्वइच्छेने सहभागी होऊन रक्तदान केले.

नवी मुंबई : महापालिका मुख्यालयातील विशेष रक्तदान शिबिर; अधिकारी, कर्मचारी यांचे स्वेच्छेने रक्तदान
नवी मुंबई महापालिका मुख्यालयात विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन

कोणत्याही व्यक्तीच्या अडचणीच्या प्रसंगात त्याला भासणारी रक्ताची गरज पुरविण्यासाठी रक्तदानाइतके श्रेष्ठ दान नाही हे लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महानगरपालिकेच्या ८३ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करीत इतरांसमोर एक उत्तम आदर्श ठेवला. यामध्ये ७५ पुरुष व ८ महिलांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे महापालिका मुख्यालयात विविध कामांसाठी भेट देणाऱ्या ४ नागरिकांनीही यामध्ये स्वइच्छेने सहभागी होऊन रक्तदान केले.

हेही वाचा- पनवेल : देवाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने बालिकेवर अत्याचार

नवी मुंबई महानगरपालिकेची वाशी सार्वजनिक रुग्णालयात स्वत:ची रक्तपेढी असून त्यामधून इच्छुक रक्तदात्यांना आवश्यकतेनुसार रक्ताचा पुरवठा केला जातो. या रक्तपेढीमधील रक्तसाठ्यात वाढ व्हावी या अनुषंगाने महापालिका रक्तपेढीच्या वतीने सकाळी १० ते सायं.५ या वेळेत विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा- नवी मुंबई महापालिका इतिहासात प्रथमच होणाऱ्या लिडार सर्वेक्षणाला मुदतवाढ

महानगरपालिकेच्या रूग्णालयांमधील आरोग्य सुविधांमध्ये विविध प्रकारच्या आजारांवरील उपचारांसाठी तसेच शस्त्रक्रियांप्रसंगी रक्ताची गरज वाढली आहे. त्यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका वाशी सार्वजनिक रूग्णालयातील माँसाहेब मिनाताई ठाकरे रक्तपेढीमार्फत विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. अशाच प्रकारचे रक्तदान शिबिर आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यामधील इच्छुक रक्तदात्यांसाठी करण्यात आले होते.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 14:53 IST

संबंधित बातम्या