scorecardresearch

बेलापूर येथे ‘इंडियन स्वच्छता लीग’चे आयोजन’; शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुणांचा सहभाग

या लीगकरीता “नवी मुंबई इको क्नाईट्स” हा नवी मुंबईकरांचा संघ स्थापित करण्यात आला असून संगीतकार, गायक पद्मश्री शंकर महादेवन हे या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहेत.

बेलापूर येथे ‘इंडियन स्वच्छता लीग’चे आयोजन’; शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुणांचा सहभाग
बेलापूर येथे 'इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन

बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात इंडियन स्वच्छता लीग’चे आयोजन करण्यात आले आहे. २२ स्प्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता सीबीडी बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम १७ स्प्टेंबर रोजीच आयोजित करण्यात आला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे हा पुढे ढकलण्यात आला होता. यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शहरातील इतर युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

हेही वाचा- सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी; पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

. वेषभूषा, घोषवाक्याद्वारे स्वच्छता विषयक सादरीकरण

यामध्ये सहभागी शाळा, महाविद्यालये यांच्यामार्फत कच-याचे ३ प्रकारे वर्गीकरण, सिंगल यूज प्लास्टिकला प्रतिबंध आणि स्वच्छता विषयक इतर बाबी अशा ३ विषयांवर सादरीकरण केले जाणार आहे. वेषभूषा, घोषवाक्ये अथवा इतर वेगळ्या कल्पना राबवून स्वच्छता विषयक सादरीकरण करणाऱ्या सर्वोत्कृष्ट ३ शाळा, महाविद्यालयांना “mygov” पोर्टलवर जास्तीत जास्त नोंदणी, सर्वोत्कृष्ट सादरीकरण व शिस्त या निकषांच्या आधारे पारितोषिके देऊन सन्मानित केले जाणार आहे.

हेही वाचा- पनवेलमध्ये एकदिवसीय जात वैधता प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन; विद्यार्थ्यांना घेता येणार लाभ

देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबईला

देशामध्ये स्वच्छतेचे महत्व प्रसारित व्हावे यादृष्टीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “स्वच्छ अमृत महोत्सव” आयोजित केला जात आहे. यामध्ये “इंडियन स्वच्छता लीग” हा अभिनव उपक्रम राबविला जात असून देशातील १८०० हून अधिक शहरांमध्ये स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात आहेत. १० ते ४० लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरात “स्वच्छ सर्वेक्षण २०२१” मध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबई शहराने मिळविलेला असून स्वच्छतेमधील मानांकन उंचाविण्यासाठी लोकसहभागातून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. या अनुषंगाने “इंडियन स्वच्छता लीग”मध्येही नवी मुंबई शहर उत्साहाने सहभागी झाले असून “यूथ वर्सेस गार्बेज” ही या अभियानाची टॅगलाईन लक्षात घेत शहरातील युवाशक्तीला एकत्र आणून स्वच्छतेचा संदेश व्यापक स्वरुपात प्रसारित केला जात आहे.

नवी मुंबईच्या स्वच्छतेत तृतीयपंथींचा सहभाग

या लीगकरीता “नवी मुंबई इको क्नाईट्स” हा नवी मुंबईकरांचा संघ स्थापित करण्यात आला असून संगीतकार, गायक पद्मश्री शंकर महादेवन हे या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहेत. वाशी से.१० ए याठिकाणी नवी मुंबईतील तृतीयपंथी नागरिक एकत्र येऊन तेथील परिसराची स्वच्छता करत नवी मुंबई शहराच्या स्वच्छतेत सक्रिय योगदान देणार आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Organized indian swachhta league on 22 september 2022 at belapur dpj

ताज्या बातम्या