scorecardresearch

उरण : सुरक्षेची जबाबदारी ही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची, पोलीसांनी स्पष्ट केली भूमिका

त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसविण्याची सूचना केली.

pankaj dahane Policeresponsibility security lies public Ganesh Utsav Mandals
सुरक्षेची जबाबदारी ही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची, पोलीसांनी स्पष्ट केली भूमिका (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

उरण: सुरक्षेची जबाबदारी ही सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची असल्याचे मत नवी मुंबई परिमंडळ – २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी व्यक्त केले. सोमवारी उरणच्या भोईर गार्डन हॉटेलच्या सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा व सुरक्षा कायम रहावी याकरिता विविध विभाग व उरण मधील नागरिकांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उरण, उलवे आदी विभागातील सामाजिक, राजकीय व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते आणि उरण नगरपरिषद, महावितरण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नागरिकांनी प्रामुख्याने रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि विजेचा लपंडाव या समस्या मांडल्या आणि त्या गणेशोत्सव काळात सोडविण्याची मागणी केली. तर उपयुक्तांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी एकेरी मार्ग,वाहनतळ तसेच कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले. त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी सीसीटीव्ही बसविण्याची सूचना केली. तर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी त्याच्या मानवी परिणामाची जाणीव करून देत सामाजिक भान ठेवण्याचे आवाहन केले.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

हेही वाचा… उरण: डिजिटलच्या काळातही कापडी मखरांची मागणी कायम; टिकाऊ आकर्षक व नैसर्गिक मखर

तसेच मुस्लिम समाजाने गणेशोत्सवासाठी ईद संदर्भात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. यावेळी बंदर विभाग सह पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, उरण नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे, नायब तहसीलदार बी. जी. धुमाळ, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम,न्हावा शेवाचे सतीश धुमाळ,मोरा पोलीस ठाण्याचे दीपक इंगोले, वाहतूक चे मधुकर भटे सामाजिक कार्यकर्ते गोपाळ पाटील,जितेंद्र म्हात्रे,सत्यवान भगत, चंद्रकांत घरत,नरेश रहाळकर आदीजण उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 16:47 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×