scorecardresearch

Premium

पनवेल शहर पोलीस झाले ‘पर्यावरण दूत’ 

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे हे उपस्थित होते.

Panvel City Police donated Ganesh idol municipality Anant Chaturdashi
पनवेल शहर पोलीस झाले 'पर्यावरण दूत' (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

पनवेल: पनवेल महापालिकेच्या गणेश मूर्ती दान आवाहनानंतर पनवेल शहर पोलीसांनी पोलीस ठाण्यातील गणेशमूर्ती अनंत चतुर्दशीच्या दूस-या दिवशी पालिकेला दान करुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे हे उपस्थित होते. पनवेल महापालिकेने मूर्ती दान करणा-या कुटूंबियांना ‘पर्यावरण दूत’ या पदवीने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. त्यामूळे मूर्तीदानाच्या या भूमिकेमुळे पनवेल शहर पोलीस यापूढे ‘पर्यावरण दूत’ म्हणून ओळखले जाणार आहेत.  

पनवेल महापालिका प्रशासनाने यंदा जास्तीत जास्त गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. नैसर्गिक तलावांमधील जलप्रदूषण रोखून पर्यावरण रक्षण करण्यासाठी हा उपक्रम पालिकेने हाती घेतला होता. अनंत चतुर्दशीपर्यंत ३२१ गणेशमूर्ती पालिकेकडे गणेशभक्तांनी दान करुन पर्यावरण रक्षणाप्रती त्यांची जागरुकता दाखवून दिली.

rahul-gandhi-
Maharashtra Hospital Death : नांदेड मृत्यूप्रकरणी राहुल गांधींनी व्यक्त केला संताप, म्हणाले, “भाजपाच्या नजरेत…”
ragging in nagpur medical college, ragging complaint at nagpur medical college
‘मेडिकल’च्या वसतिगृहात रॅगिंग? रात्री विद्यार्थ्यांना…
ravindra tonge
“जरांगेंवर उपोषण मंडपात उपचार, मग रवींद्र टोंगेंना रुग्णालयात हलवण्याचा आग्रह का?” ओबीसींचा प्रश्न; नेमकं काय घडलं? वाचा…
What Manoj Jarange Patil Said?
दिवस संपला तरी मुख्यमंत्री आले नाहीत; मनोज जरांगे पाटील म्हणाले, “उद्या सकाळी…”

हेही वाचा… ढोलताशांच्या निनादाने पनवेलकरांची मध्यरात्र जागवली

नागरिकांप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी सुद्धा गणेश मूर्ती दानाचा संकल्प करुन पोलीस विभागात नवा पायंडा पाडला. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आवारात गणेशोत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा होती. या गणेशोत्सवातील गणेशमूर्ती विसर्जनापूर्वी वाजतगाजत मिरवणूक काढणे त्यानंतर तलावामध्ये विसर्जन करणे ही सुद्धा परंपरा होती. मात्र गणेशमूर्ती दान करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा… नेरूळमध्ये अर्ध्या तासात १९.८० मिमी पावसाची नोंद; सायंकाळी बेलापूर नेरुळला पावसाने झोडपले

कर्मचारी वर्गासह वरिष्ठ पोलीस निरिक्षक ठाकरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजपूत यांनी सुद्धा गणेशमूर्ती मिरवणूकीत ताल धरल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेच्या आवाहनाला सरकारी कार्यालयांपैकी पोलीस विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचा-यांंनी घेतलेल्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Panvel city police donated the ganesh idol to the municipality on the second day of anant chaturdashi dvr

First published on: 30-09-2023 at 11:11 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×