पनवेल : पनवेल तालुक्यामध्ये मागील २४ तासांमध्ये ११० मीलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. संततधारेमुळे काही ठिकाणी वगळता सखल भागात पाणी साचण्याच्या घटना गुरुवारी दुपारपर्यंत घडल्या नाहीत. गाढी नदीतील पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा चार मीटरने कमी होती. परंतू पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नांदगाव पुलाखाली एक मोटार अडकल्याची घटना घडली. मुसळधारांमुळे आणि दुपारी समुद्राच्या मोठ्या भरतीमुळे महापालिकेने गुरुवारी शाळांना सकाळी सुट्टी जाहीर केली. सरकारी प्रशासनाचे लक्ष समुद्राच्या भरती आणि पडणाऱ्या पावसाकडे लागले आहे.गाढी नदीतील नांदगाव पुलाखाली दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. परंतू नदीकाठी आज पाणी पातळीत वाढ झाल्याने मोटार या पाण्यात अडकली. मोटारीत बसलेल्या वाहनचालकावर बाका प्रसंग ओढावला. मात्र वाहनचालक सुखरूप मोटारीतून बाहेर पडला. मोटार पाण्यातून बाहेर काढण्यासाठी टोईंग व्हॅनची मदती घ्यावी लागली. हेही वाचा.हेटवणे धरणाचे ६ दरवाजे उघडले आता तरी पाणी कपात रद्द करा – रहिवाशांची मागणी निम्मी मोटार नदीपात्रात अडकली होती. गुरुवारी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आपत्ती टाळण्यासाठी पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सरकारी शाळा, खासगी व्यवस्थापनाच्या शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा, प्रशिक्षण केंद्रांना सुट्टी देण्याविषयीचे परिपत्रक जाहीर केले होते. गुरुवारी सकाळपासून पनवेलमधील नद्या दुथडी भरुन वाहत होत्या. खाडी क्षेत्रातही पाणी पातळी वाढलेलीच होती.