पनवेल : शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पीएनजी (पाईपद्वारे नैसर्गिक वायू) जोडणी घेण्याचे आवाहन केले आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक गॅसचा वापर वाढवण्यावर भर दिला जात असून, त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सांगितले की, पनवेल शहरात पायाभूत सुविधांची उभारणी सक्षमपणे झाल्यामुळे नैसर्गिक वायू वितरणाला गती मिळाली आहे. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) मार्फत अखंड पीएनजी व सीएनजी पुरवठ्याची हमी देण्यात आली आहे. यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांच्या बैठका घेण्यात येणार असून, प्रभागनिहाय नोंदणी शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.

केंद्र शासनाच्या ९ मार्चच्या आदेशानुसार घरगुती पीएनजी व सीएनजीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण इंधन उपलब्ध होणार आहे. या उपक्रमासाठी महापालिकेने आवश्यक परवानग्या व समन्वय उपलब्ध करून दिला आहे.

एमजीएलकडून ग्राहकांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. १६ मार्च ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान नवीन नोंदणी करणाऱ्यांना ५०० रूपये किमतीचा मोफत गॅस दिला जाणार आहे. तसेच कोणतेही आगाऊ शुल्क न घेता मीटर बसवल्यानंतर बिल आकारले जाणार असून, हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

व्यावसायिक ग्राहकांसाठी नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे.दरम्यान, नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी अज्ञात लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी किंवा बँक माहिती शेअर करू नये, तसेच केवळ अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

व्यावसायिक ग्राहकांसाठी आकर्षक योजना

.नोंदणी शुल्क पूर्णतः माफ
.आवश्यक पायाभूत सुविधा कंपनीकडून उभारली जाणार
.पनवेल महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, पर्यावरणपूरक व सुरक्षित इंधन म्हणून पीएनजीचा जास्तीत जास्त वापर करावा व या योजनांचा लाभ घ्यावा.

फसवणूक टाळण्यासाठी सूचना

-अज्ञात लिंकवर क्लिक करू नये
-एपीके फाईल डाउनलोड करू नये
-ओटीपी किंवा बँक संबंधित माहिती कोणाशीही शेअर करू नये
-केवळ एमजीएल च्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावरच (निळा टिक चिन्हासह) विश्वास ठेवावा.

नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे

1) रहिवासी पुरावा (कोणताही एक)
2)वीज बिल
3)इंडेक्स २ ची प्रत
4)पासपोर्ट
5) ओळखपत्र (कोणताही एक)
आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / वाहन चालविण्याचा परवाना
6) ईमेल आयडी
7) पर्यायी मोबाईल नंबर

आपल्या सोसायटीसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सोयीस्कर गॅस पाईप लाईन सुविधा मिळवण्यासाठी व सोसायटीमध्ये कॅम्प लावण्यासाठी या अधिकृत प्रतिनीधींशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे महानगर गॅस कंपनीकडून प्राप्त माहितीनुसार महानगर गॅसचे संपर्कासाठीचे अधिकृत  प्रतिनिधी

प्रभाग – अ : खारघर शहर

1.विनायक म्हमाणे – 9967544387
2.महेश थोरात – 9594391189
3.रवी सोनावणे – 8451089777
4.सचिन गोरे – 9029821713
5.मोहमद अकील – 7678076370

प्रभाग – ब : कळंबोली शहर

1.ऋषिकेश भोईर – 7718078533

प्रभाग – क : कामोठे शहर

1.संतोष जाधव – 8828989972
2.राज  – 8600520728

प्रभाग – ड : पनवेल / कारंजाडे शहर

पनवेल शहर

1.अमित पवार – 9867814249
2.सुरज म्हात्रे – 7021933014

नवीन पनवेल शहर

1.राजरत्न भोसले – 9702880743

 खांदा कॉलनी

1.प्रदीप शेंडकर – 9699914149

 कारंजाडे शहर

1.आकाश देशमुख – 7506462847
2.सुरज म्हात्रे – 7021933014