सभागृह नसल्याने प्रशासनावर नामुष्की

पनवेल महापालिका स्थापन होऊन आठ महिने पूर्ण झाले असून या पालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर आता या सदस्यांनी बसायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे. कारण पनवेल पालिकेची निर्मिती होऊन आठ महिन्यांचा कालावधी गेला असला तरी अद्याप प्रशासनाने एकही सभागृह उभे केले नसल्यामुळे महापालिकेच्या पहिल्या महासभेचे आयोजनाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे या समस्येवर आता पनवेल शहरातील वासुदेव बळवंत नाटय़गृहात पालिकेची पहिली महासभा घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांकडून दिली जात आहे.

Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
VAishali Darekar on shrikant shinde
श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर; ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर म्हणाल्या, “एकवेळ चौक कमी पडतील…”
महायुतीत सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्या भेटीने चर्चेला उधाण (संग्रहित छायाचित्र)
महायुतीत सहभागी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार व काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्या भेटीने चर्चेला उधाण
Vasant More
मी १०० टक्के निवडणुकीच्या रिंगणात, ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत – वसंत मोरे

पनवेल पालिकेत ७८ सदस्य, पालिका प्रशासनाचे विविध विभागांचे २० मुख्य अधिकारी, पिठासीन अधिकारी, महापौर व उपमहापौर यांच्या बसण्याची व्यवस्था पालिकेच्या सध्याच्या इमारतीमध्ये नसल्यामुळे पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर निवडणूक नियंत्रण कक्षाच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात सभागृह चालविण्याचा प्रशासनाचा विचार होता. मात्र ही जागा अपुरी असल्यामुळे महासभेसाठी नाटय़गृहाचा वापर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शिवाय तात्पुरत्या स्वरूपात महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांच्या दालनाची सोय करण्याचे काम पालिका प्रशासन लवकरच हाती घेणार आहे.

नगरसेवकांना १५ दिवसांची उसंत

पालिका प्रशासनाने निवडून आलेल्या सदस्यांच्या नावांचे अध्यादेशाचे परिपत्रक नगरविकास विभागाच्या आयुक्तांकडे पाठविल्यानंतर पहिली महासभेची वेळ ठरणार आहे. या सर्व प्रक्रियेला पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने मागील दीड महिन्यापासून मतदारांचे उंबरठे झिजविणाऱ्या सदस्यांना अजून १५ दिवसांची उसंत मिळणार आहे.

नाटय़गृहातील कार्यक्रमांमध्ये सावळागोंधळ

निवडणुकीच्या दरम्यान नाटय़गृहात महापालिकेने निवडणुकीच्या प्रशिक्षणाचे मार्गदर्शन ठेवले होते. सकाळी सुरू होणारे हे प्रशिक्षण दुपारी संपणे अपेक्षित होते. मात्र प्रशिक्षणाचे वर्ग सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहिल्यामुळे त्याचा फटका व्यावसायिक नाटय़स्पर्धेतील प्रयोगाला बसला होता. त्यामुळे याची पुनरावृत्ती महासभेच्या वेळी होण्याची शक्यता आहे. मुळातच नाटय़गृहांमधील गैरसोय आणि अनियोजित कारभारामुळे राज्यभरातील नाटय़कलावंतांनी पनवेल फडके नाटय़गृहाला हात जोडले आहेत. शिवाय त्यात आता महासभेचे आयोजन केले जाणार असल्यामुळे सामान्य रसिकांना पुन्हा नाटक पाहण्यासाठी मुंबई व नवी मुंबईतील नाटय़गृहांच्या उंबऱ्यापर्यंतचा प्रवास करावा लागेल, अशी भीती नाटय़प्रेमी व्यक्त करत आहेत.

कशी असेल महासभेची प्रक्रिया

पालिकेच्या पहिल्या महासभेत नगरविकास विभागाचे विभागीय आयुक्त किंवा रायगडचे जिल्हाधिकारी हे पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील. या वेळी ७८ नगसेवकांची ओळख व स्वागताचा कार्यक्रम महासभेत होणार आहे. त्यानंतर राजकीय पक्षांचा गटनेता, महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या प्रक्रिया याच सभेत पार पडणार आहे. या वेळी महासभेत सभागृहासमोर कोणताही ठराव किंवा प्रश्न मांडण्यात येणार नाही.