Premium

पनवेल महापालिकेच्या ऑनलाईन परीक्षेला सुरूवात

पनवेल महापालिकेमधील ४१ संवर्गातील ३७७ विविध पदांसाठी राज्यभरात एकाच वेळी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून परिक्षेला सुरूवात झाली.

panvel municipal corporation recruitment, panvel municipal corporation
पनवेल महापालिकेच्या ऑनलाईन परिक्षेला सुरूवात (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

पनवेल : पनवेल महापालिकेमधील ४१ संवर्गातील ३७७ विविध पदांसाठी राज्यभरात एकाच वेळी शुक्रवारी सकाळी नऊ वाजल्यापासून परिक्षेला सूरुवात झाली. पुढील चार दिवस राज्यभरातील २१ जिल्ह्यातील ५७ परिक्षा केंद्रांवर ऑनलाईनपद्धतीने या परिक्षेत ५५२१४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामध्ये दोन आणि खालापूर तालुक्यातील रसायनी येथे एक असे तीन केंद्रांवर ही परिक्षा घेतली जात आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त गणेश शेटे यांनी रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयातील परिक्षा केंद्राला शुक्रवारी पावणे नऊ वाजता भेट देऊन तेथील नियोजनाचा आढावा घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी राजपत्रित अधिकारी, पोलीस बंदोबस्त, पर्यवेक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, सीसीटिव्ही कॅमेरांच्या देखरेखीमध्ये परिक्षेला सूरुवात झाली. राज्यभरातील ५७ परिक्षा केंद्रात सुद्धा याच पद्धतीने नियोजन केल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी दिली. राज्यभरात ही परिक्षेवरील नियंत्रणासाठी स्थानिक जिल्ह्यातील ४९८ अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. रसायनी येथील परिक्षा केंद्रामध्ये एका संगणक प्रयोगशाळेत ९० उमेदवारांची बैठकीची सोय महापालिकेने केली होती.

हेही वाचा : उरण : जासईच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्के भूखंडाच्या इरादापत्राचे वाटप, गव्हाण स्थानकांच्या कामाचा मार्ग मोकळा

शुक्रवारी ६७ उमेदवारांनी सकाळच्या पहिल्या सत्रात परिक्षा दिली. परिक्षेदरम्यान अनुचित प्रकार आढळल्यास थेट फौजदारी कार्यवाही करण्याची सूचना आयुक्त देशमुख यांनी संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधिक्षकांना केली आहे. प्रत्येक केंद्रातील परिक्षा खोलीत चार ते आठ सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले असून २५ परिघ मीटर क्षेत्रातील इंटरनेट सेवेवर जॅमर लावल्याची लावल्याची माहिती आयुक्त देशमुख यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Panvel municipal corporation recruitment exam starts css

First published on: 08-12-2023 at 12:05 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा