scorecardresearch

पनवेल : पोयंजे गावात वृद्धाचा खून

तालुक्यातील पोयंजे गावात सोमवारी पहाटे एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह नदीतील पाण्यात तरंगताना आढळला.

पनवेल : पोयंजे गावात वृद्धाचा खून
संग्रहित छायाचित्र /लोकसत्ता

तालुक्यातील पोयंजे गावात सोमवारी पहाटे एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह नदीतील पाण्यात तरंगताना आढळला. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास मृतदेह दिसल्यानंतर गावच्या पोलीस पाटील व सरपंचानी याची माहिती पोलीसांना दिली. पोलीस व गावातील पंचांनी मृतदेहाची ओळख पेटविली. ७२ वर्षीय पांडुरंग म-या मते यांचे हे शव असल्याचे समजले.

हेही वाचा >>> खराब रस्त्यांमुळे उरणमध्ये ‘धुळवड’, चालक-प्रवाशांना सक्तीचा मनस्ताप

पांडुरंग यांच्या डोक्यावर चार ठिकाणी जखमा दिसल्याने पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल करत पांडुरंग यांचे शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पनवेल येथे पाठविले. पांडुरंग घरापासून दूर असलेल्या त्यांच्या शेतघरात राहत होते. पांडुरंग हे राहत असलेल्या घरापासून रविवारी रात्री पाली बुद्रुक गावाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारील वालिच्या डोहापर्यंत कसे आले याचा पोलीस शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या