पनवेल : पनवेल पालिका क्षेत्रातील करोना बाधितांची टक्केवारी २.३५ टक्के असलीतरी रायगड जिल्ह्यची टक्केवारी ३.३ टक्के असल्याने रायगड जिल्ह्यचा समावेश सरकारने तीस—या श्रेणीत केल्याने पूर्वीप्रमाणे

निर्बंध न हटविलेल्या श्रेणीत रायगड जिल्हा आला आहे. मंगळवारी सरकार करोना बाधितांची संख्या पनवेलमध्ये कमी असल्याने येथील व्यापा—यांना रात्री ८ वाजेपर्यंत सवलत मिळेल, अशी अपेक्षा होती परंतू मंगळवारी व्यापारी व हॉटेलमालकांचा हिरमोड झाला.

पालिका क्षेत्रात मंगळवारी ६६ रुग्ण नवीन आढळले तर एकाच दिवसात १४९ जण बरे झाले. पालिकेच्या आरोग्य विभागाने ४,९४,४५६ जणांची चाचणी केली असून प्रतिदिन अडीच हजार जणांच्या करोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी आरोग्य विभागाला दिले आहे. आजही पनवेलमध्ये विविध रुग्णालयात ७१० रुग्ण उपचार घेत आहेत.