पनवेल : अपंग आणि वयोवृद्ध अशा व्यक्तींच्या घरापर्यंत मतपेटी घेऊन जाऊन निवडणूक आयोगाचे पथक मतदान करुन घेतात. याच योजनेतून मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल विधानसभा क्षेत्रामधील ५२ व्यक्तींनी त्यांच्या घरुन मतदानाचा हक्क बजावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळ लोकसभा मतदारसंघात २५ लाखांहून अधिक मतदार आहेत. यापैकी या मतदारसंघात ८५ वर्षे वयाच्या पुढील २३ हजार ७३८ मतदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल विधानसभा क्षेत्रात ८५ वर्षांच्या पुढील आणि अपंग असे चार हजारांहून मतदार आहेत. अशा विशेष व्यक्तींसाठी निवडणूक आयोगाने शंभर टक्के मतदान होण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत मतपेटीत थेट मतदान करता येईल असे नियोजन केले आहे. परंतु पनवेल विधानसभा क्षेत्रातील ४ हजारांपैकी प्रत्यक्षात ५२ मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे. ही योजना ऐच्छिक असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर पनवेलचे सहाय्यक निवडणूक निर्णय राहुल मुंडके यांनी एप्रिल महिन्यात निवडणूक आयोगाचे पथक संबंधित मतदारांच्या घरी पाठविले. अशा मतदारांना १२ डी नमुण्याचे अर्ज भरुन घेण्यात आले. निवडणूक आयोगाच्या आवाहनानंतर पनवेलमधील ८५ वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या ४१ मतदारांचे आणि १६ अपंग मतदारांचे घरुनच मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाच्या पथकाला अर्ज भरुन दिले होते. संबंधित अर्जानूसार ३ ते ९ मे या दरम्यान या योजनेतील मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक आयोगाच्या पथकाने संबंधित मतदारांपर्यंत मतपेटी पोहोचवल्यामुळे त्यांना मतदान करता आले. ४० वयोवृद्ध आणि १२ अपंग मतदारांनी त्यांचे मतदान केल्याची माहिती मावळ लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी दिली. विशेष म्हणजे पनवेल विधानसभा क्षेत्रामध्ये ११० वय वर्षाचे १०३ मतदार आहेत.

हेही वाचा – शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात १० लाखांच्या वीजचोरीचा गुन्हा दाखल

हेही वाचा – पनवेल : प्रेमजाळ्यात महिलेला अडकवून ३० लाखांची फसवणूक

पनवेल विधानसभा क्षेत्रातील ८५ वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या, दिव्यांग आणि खास सवलत असणाऱ्यांसाठी घरुनच मतदान करण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात आली आहे. चार हजारांपुढे या मतदारांची संख्या असली तरी निवडणूक आयोगाच्या आवाहनानंतर पनवेल विधानसभा क्षेत्रातील ५७ जणांनी १२ डी नुसार अर्ज केला. त्यामुळे ५७ मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना घरुनच मतदानाची प्रक्रिया राबविली. जे मतदार एकदा जाऊन घरी सापडले नाहीत अशांसाठी पुन्हा निवडणूक आयोगाचे पथक त्यांच्या घरीसुद्धा गेले. १० मेच्या पूर्वी होणे गरजेचे होते. ज्या ५२ मतदारांनी घरुन मतदान केले त्यांना १३ मे रोजी होणाऱ्या मतदानावेळी मतदान करता येणार नाही. – राहुल मुंडके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मावळ लोकसभा मतदारसंघ

More Stories onपनवेलPanvel
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel out of 4 thousand voters 52 voters exercised their right to vote from home ssb