पनवेल : कोकण रेल्वेने रत्नागिरी ते मुंबई या पल्यावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दरवाजात उभे राहून हातात मोबाईल फोन ठेवणे महाग पडले आहे. आठवडाभरापूर्वी (ता. २२) २८ वर्षीय अजित गोवलकर हे दापोली ते मुंबई असा प्रवास करताना ते दरवाजाजवळ उभे होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमटणे ते पनवेल या दरम्यान रेल्वे धावत असताना त्यांच्या हाताला कसला तरी फटका बसला. हाताला मार लागल्याने त्यांनी त्यांच्या हातामधील मोबाईल त्याच ठिकाणी पडला.

हेही वाचा…कळंबोली लोखंड बाजारातील गोदाम फोडून २६ लाखांचा माल मुंबईला विकणाऱ्याला अटक

त्यामुळे अजित यांचा मोबाईल जबरी चोरी झाल्याची तक्रार त्यांनी तीन दिवसांपूर्वी (ता.26) पनवेल शहर पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger s mobile phone stolen while standing at train door on konkan railway psg