नवी मुंबई : वाशी सेक्टर ११ येथे वाशी पोलीस आणि गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत बेकायदा राहणाऱ्या १४ नायजेरिया देशाच्या नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे पारपत्र नसल्याचे उघड झाले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.

वाशी सेक्टर ११ जुहूगाव येथे एक खानावळ असून या ठिकाणी केवळ नायजेरियन नागरिक येतात, अशी माहिती वाशी पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेची मदत घेत सदर ठिकाणी कारवाई केली असता नायाजेरियन नागरिक आढळून आले. त्यांच्यामध्ये १४ जणांकडे पारपत्र नव्हते. यात ९ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे.

या सर्वाना एक दिवसाची कोठडी देण्यात आली आहे या आरोपींकडे पारपत्र आढळून आले नसले तरी पारपत्र व्हिसा द्वारे त्यांनी देशात प्रवेश केला. व्हिसाची मुदत संपल्याने कागदपत्रे दाखवली गेली नाही वा कुठलेही कागदपत्र नसताना आले कसे याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती मालमत्ता व अमलीपदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरिया यांनी दिली. ज्या ठिकाणी फक्त नायाजेरियन नागरिकांसाठी खानावळ आहे ती भाडेकरार कायद्यानुसार आहे का? याचाही शोध सुरू आहे.