नवी मुंबईतील खांदेश्वर वसाहतीमधील एका चाळीत रम्मी पत्ते खेळणाऱ्या ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुगारबंदी कायद्याअंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. परवानगीशिवाय हे ११ जण पैसे लावून रम्मी खेळत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या ११ जणांकडून २ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नवी मुंबई शहराचे लँडमार्क वंडर्स पार्क लवकरच खुले होणार; नव्या खेळण्यांसह देखण्या पार्कचे मेकओव्हर

खांदेश्वरमध्ये रम्मी व तीन पत्यांचा जुगार सूरु असल्याच्या अनेक तक्रारी सूरु होत्या. त्यामुळे पोलीस उपायुक्त पाटील यांच्या खास पथकाने खांदेश्वर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बातमीदारांकडून याबाबतची माहिती घेतल्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यातील नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १३ येथील ए टाईपच्या चाळ नंबर १९ मधील दुस-या माळ्यावरील खोली नंबर चार येथे हा जुगाराचा अड्डा सूरु असताना उपायुक्त पाटील यांच्या पथकातील पोलीस हवालदार वैभव शिंदे यांनी पत्ते खेळणा-यांना रंगेहाथ पकडले. रिक्षाचालक राजेंद्र कोळी, सेवानिवृत्त हरिशचंद्र जोशी, मोठा खांदा येथे राहणारे हनुमान दुंद्रकर, आपटे गावचे गणेश भोईर, सूकापूर गावचे रंगारी काम करणारे सूनील भगत, नोकरी करणारे सूकापूरच्या प्रयाग आंगण सोसायटीमध्ये राहणारे सूमीत पाटील, पनवेलच्या ठाणा नाका येथे राहणारे किरण वाघेला, सूकापूर येथील दीपु तराई, देवद गावातील विजेंद्र गावंड, नवीन पनवेल येथील जितेश खिलदकर, सेवानिवृत्त पनवेलच्या मुनोत रिजेन्सीमध्ये राहणारे अशोक अगज, अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा- उरण वायू विद्युत केंद्र दुर्घटनेतील कामगारांच्या पत्नीला नोकरी आणि ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्या; शासनाकडे प्रस्ताव

आरोपींना पोलीस स्थानकात आणल्यानंतर त्यांची अंगझडती व त्यांचे जबाब घेण्यात आले. जबाबानंतर ते कधीपासून रम्मी पत्ते किती रुपये लावून खेळतात याची चौकशीही पोलीस करत आहेत. त्यांचे रहायचे पत्ते पोलीसांनी घेतल्यानंतर त्यांचे ओळखपत्रांची सहनिशा केल्यानंतर त्यांना खांदेश्वर पोलीस ठाण्यात पहाटे उशीरा सीआरपीसी नियमाने ४१ अ १ अन्वये नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पनवेलमध्ये अशा पद्धतीचे अनेक जुगार अड्डे सूरु असून त्यावर लवकरच पोलीस उपायुक्तांचे पथक कारवाई करणार आहे. विशेष म्हणजे पोलीस उपायुक्तांचे खास पथक जुगार अड्यांवर मध्यरात्री सापळा रचून कायदेशीर कारवाई केली. मात्र, स्थानिक खांदेश्वर पोलीस या अड्यावर त्यापूर्वीच का कारवाई करु शकले नाही याची चर्चा परिसरात आहे.

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या कारवाईमुळे अनेक जुगा-यांचे धाबे दणाणले आहेत. टाईमपास पत्ते खेळण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून अधिकृतपणे क्लबचा परवाना दिला जातो. अनेकांनी असे अधिकृत परवाने काढून टाईमपास क्लब सूरु केलाय. पोलीस त्या परवाना ठिकाणांना भेटी देऊन वेळोवेळी तेथे खरंच पत्यांनी टाईमपास सूरु आहे का, पैशांचा जुगार खेळला जातो यावर लक्ष देतात. त्यामुळे रम्मी पत्ते खेळताय तर तो पैशांनी खेळण्यापेक्षा पोलिसांनी परवाना दिलेल्या अधिकृत क्लबमध्ये जाऊन पैशांशिवाय टाईमपास म्हणून खेळावा, असे आवाहन पोलीसांकडून होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police detained 11 people who were playing rummy cards navi mumbai news dpj
First published on: 11-10-2022 at 18:08 IST