माजी विरोधीपक्ष नेते मनोज हळदणकर यांच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी लावलेले बेकायदा फलक काढताना त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण आणि धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  संदिप भिमराव जाधव, हे यातील फिर्यादी असून ऐरोली विभाग कार्यालयात अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत. २३ तारखेला त्यांना वरिष्ठ  लिपीक विष्णु शिंगवे यांचेसोबत ऐरोली परिसरातील विनापरवाना अनाधिकृत लावलेले बॅनर काढण्याचे आदेश मिळाले. त्यानुसार ते अतिक्रमण पथकांसह  ऐरोली परिसरात रवाना झाले. दुपारी एकच्या सुमारास ऐरोली विभाग कार्यालय शेजारी  फोनिक्स शाळेच्या शेजारी, रिक्षास्टैंड जवळ माजी नगरसेवक मनोज हळदनकर यांनी गुढीपाडवा शुभेच्छा. सदर्भात विनापरवाना अनाधिकृत बॅनर लावलेले दिसुन आले.

हेही वाचा >>> नवी मुंबई: महापालिका रुग्णालयात आर्थिक व्यवहारातून झालेल्या कर्मचारी भरतीच्या चौकशीची मागणी

article about conspiracy to defame the judiciary constitution protection by judiciary
लेख : न्यायपालिकेच्या बदनामीचे षड्यंत्र!
Kamal Nath
“…तर मी काँग्रेसमधून बाहेर पडेन”, कमलनाथांनी कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केली भूमिका
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
meetings between ola uber companies and cab drivers
ओला, उबरचा तिढा सुटेना! कॅबचालक भाडेवाढीच्या मागणीवर ठाम; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष

सदर बॅनर हे माजी नगरसेवक मनोज हळदनकर यांनी गुढीपाडवा शुभेच्छा सदर्भात विनापरवाना लावलेले असल्याने ते बॅनर वरिष्ठ लिपीक विष्णु शिंगवे यांनी कामगारास काढण्यास सांगितले. सदर बँनर कामगारांनी काढुन झाल्यानंतर ते महानगरपालिकेचे गाडीत ठेवुन दिले. तेवढ्यात सदर ठिकाणी माजी नगरसेवक मनोज हळदनकर व त्यांचे सोबत ४ इसम आले. मनोज हळदनकर व त्याचे सोबतचे ४ इसमानी सदर पथकाला शिवीगाळ करत धक्का बुक्की करु लागले. तसेच फिर्यादीला दोन थप्पड मारल्या व इतरांनाही मारहाण केली . त्यामुळे जेव्हा हे पथक विभाग कार्यालयात पोहचले व त्यांनी या बाबत वरिष्ठांना माहिती दिली, त्यामुळे विभाग अधिकारी महेश सप्रे यांच्या मार्गदर्शखाली मनोज हळदनकर यांच्या विरोधात शिवीगाळ करणे, धमकी देणे, मारहाण करणारे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी डी  ढाकणे यांनी दिली.