नवी मुंबई: नशा मुक्त अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांनी धडाडीची अजून एक कारवाई केली आहे. या कारवाईत गांजा विकणाऱ्या ४८ जणांच्या घरी छापे टाकण्यात आले. यात ४० लाख रुपयांचा २० किलो गांजा जप्त करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नशा मुक्त अभियान अत्यंत गांभीर्याने राबवले आहे. एप्रिल मध्ये आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करीची टोळी उघडकिस आणण्यात यश आले होते. त्यांच्या कडून २ कोटी ७२ लाख रुएए किंमतीचा हायड्रो गांजा जप्त केला होता. त्यामध्ये गांजा विक्रेते, कस्टम अधिकारी, भारतीय पोस्ट अधिकारी, मध्यस्थी हवाला मार्फत पैसे व्यवहार करणारे अंगडीया व नवी मुंबई आयुक्तालयातील २ पोलीस अंमलदार यांना अटक करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी हे डार्क वेबच्या माध्यमातुन हायड्रो गांजा परदेशातून मागवत होते.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात राहणाऱ्या अभिलेखावरील व संशयित अशा ४८ जणांची नावे शोधून काढण्यात आली. त्यांच्यावर कारवाई साठी व्हिव्ह रचना आखण्यात आली. एकाच वेळी कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस संदीप निगडे, यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखा, परिमंडळ-१ व २ कडील ५० पोलीस अधिकारी व १०० पोलीस अंमलदारांचे वेगवेगळे ४८ पथक स्थापन करण्यात आले.
या पथकाने एकाच वेळी ४८ संशियतांच्या घरी शुक्रवारी आज सकाळी पाच वाजता एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या.या ४८ पैकी सात जणांच्या कडे ४० लाख रुपयांचा २० किलो ७०० ग्रॅम गांजा ‘ हा अंमली पदार्थ व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये ७ आरोपींना अटक करण्यात आलेली असुन त्यांच्या विरूध्द तळोजा, कळंबोली, खारघर, रबाळे एमआयडीसी-२, वाशी-२ असे एकुण ०७ गुन्हे अमली पदार्थ विरोधी कायदयांतर्गत दाखल करण्यात आलेले आहेत. या कारवाईत अन्य काही जणांची नावे पुढे आले आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहेत.