मुंबई कृषि उत्पन्न कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास रखडला आहे. त्याच बरोबर इतर बाजारांची ही दयनीय अवस्था झालेली आहे. नवी मुंबईतील बोनकोडे येथे नुकतीच इमारती ढासळण्याची घटना घडली आहे. त्यामुळे धोकादायक आणि अनधिकृत बाधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. फळ बाजारातील गाळ्यांचे स्लॅब कधी ही कोसळतील आशा स्थिती आहेत. दिवसेंदिवस फळ बाजाराची दुरवस्था होत आहे. याठिकाणी कोणती दुर्घटना घडल्यानंतरतरच एपीएमसी जागी होणार का? अपघातानंतरच डागडुजी करणार का? असा प्रश्न व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> स्वच्छता सर्वेक्षणात पनवेल पालिकेचा राज्यात ५ वा तर देशात १७ वा क्रमांक

सन ११९० मध्ये एपीएमसी प्रशासनाने ठेकेदार पद्धतीने भाजीपाला व फळ बाजार समितिची उभारणी केली होती. तेव्हा पासून आजतागायत या आवारातील इरमातींची देखभालदुरुस्ती करण्यात आलेली नाही. फळ बाजारात देखभाल, रंगरंगोटी, दुरुस्ती करण्यात प्रशासनाने कानाडोळा केल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. भाजीपाला बाजारात एक हजार तर फळ बाजारात एक हजार २९ गाळे आहेत. मात्र मुंबईतील बाजार समिती वाशी येथे स्थलांतरित झाल्यापासून पाच ही बाजार समितीत आद्यप एकदाही डागडुजी, दुरुस्ती, रंगरंगोटी झालेली नसल्याने दुरवस्था झालेली आहे. फळ बाजारातील गाळे बाहेरून जीर्ण झाले असून, स्लॅब पडत आहेत. स्लॅब पडले असून सळ्या दिसत आहे. तर आजही काही गाळ्यांचे स्लॅब पडण्याची दाट शक्यता आहे. मात्र एपीएमसीचे संचालक मंडळ आणि एपीएमसी प्रशासनाला याकडे लक्ष देण्यासाठी फुरसत नाही, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतुन उमटत आहे. एपीएमसी बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : नवरात्र जोरात झाली दिवाळीही उत्साहात होणार – एकनाथ शिंदे

फळे, भाजीपाला व कांदा बटाटा बाजारातील व्यापारी गेल्या तीस वर्षांपासून दुरुस्ती न झालेल्या व मोडकळीस आलेल्या बाजाराची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी करीत आहेत. फळ बाजाराच्या डागडुजीसाठी एपीएमसी प्रशासनाकडून ७३ लाख निधीचा प्रस्ताव मंजूर करून एक महिना झाला आहे . मात्र अद्याप दुरुस्तीला सुरुवात करण्यात आलेली नाही, त्यामुळे लवकरात लवकर फळ बाजारची डागडुजी करावी असे मत व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Poor condition of apmc fruit market amy
First published on: 05-10-2022 at 15:17 IST