नवी मुंबई: एपीएमसीत कांदा वधारला; अजून दरवाढ होण्याची शक्यता |posibilty of further increase in onion price in apmc market navi mumbai | Loksatta

नवी मुंबई: एपीएमसीत कांदा वधारला; अजून दरवाढ होण्याची शक्यता

मात्र गणेशोत्सव कालावधीत मुसळधार पावसाने चाळीतील साठवणुकीचा कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून त्याचबरोबर नवीन लाल कांद्याच्या उत्पादनाला ही फटका बसला आहे.

नवी मुंबई: एपीएमसीत कांदा वधारला; अजून दरवाढ होण्याची शक्यता
संग्रहित छायाचित्र

मुंबई कृषी उत्पन्न कांदा-बटाटा बाजार समितीत दिवाळी सणानिमित्ताने आवक घटली असून दरात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी उपलब्ध असलेला कांदा वधारला असून आता २२ ते २८रुपयांनी विक्री होत आहे. पुढील कालावधीत कांद्याची दरवाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वाशीच्या एपीएमसी घाऊक बाजारात कांद्याच्या बाजारभावात पुन्हा वाढ झालेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर १२ते १५ रुपयांवर स्थिर होते.

हेही वाचा : नवी मुंबई: वारंवार हॉर्न वाजवला म्हणून दुचाकीस्वाराला जबर मारहाण

मात्र गणेशोत्सव कालावधीत मुसळधार पावसाने चाळीतील साठवणुकीचा कांदा भिजल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झाला असून त्याचबरोबर नवीन लाल कांद्याच्या उत्पादनाला ही फटका बसला आहे. त्यामुळे कांदा महागला आहे.आता दिवाळी निमित्ताने सुट्टीत कांदा काढणीसाठी आणि शेतमाल भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसल्याने बाजारात कांद्याची आवक निम्म्यावर आली असून मागणीत ही वाढ झाल्याने दरवाढ झाली आहे, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली आहे. बाजारात नित्यनेमाने कांद्याच्या ९०-१०० गाड्या दाखल होत असतात,परंतु आज गुरुवारी बाजारात केवळ ४५ गाड्यांची आवक झाली आहे. किरकोळ बाजारात कांद्याने चाळीस रुपयांचा दर गाठला आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-10-2022 at 12:39 IST
Next Story
नवी मुंबई: वारंवार हॉर्न वाजवला म्हणून दुचाकीस्वाराला जबर मारहाण