उरण : नवघर उड्डाणपूल हा उरण तालुक्यातील वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग आहे. या पूलामुळे पूर्व व पश्चिम हे विभाग जोडले जातात. मात्र मागील अनेक महिन्यांपासून नवघर उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. तर दुसरीकडे पुलावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे पुलावर अंधारही पसरला आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे पुलाच्या कडेला व दुभाजकावर आलेली झाडे झुडपे ही वाढली आहेत. या झुडपामुळे वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नाही. अशा अनेक समस्यांना या उड्डाणपूलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.

उरण पनवेल राज्य महामार्गावरील फुंडे येथील साकव नादुरुस्त झाल्याने उरण तसेच द्रोणागिरी नोड या औद्योगिक विभागामध्ये ये जा करणारी प्रवासी व जड वाहने याच उड्डाणपुलाचा वापर करीत आहेत. पुलाच्या द्रोणागिरी नोड व उरण पनवेल मार्ग या दोन्ही बाजूने खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यातील धुळीचाही सामना करावा लावत आहे.

dombivli traffic jam marathi news
माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन
Potholes on Mangalwar Bazar flyover road in nagpur
उदंड झाली वाहने अन् रस्त्यावर खड्डेच खड्डे! उपराजधानीतील सदर मंगळवारी बाजार उड्डाणपुलावर…
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
dombivli traffic jam marathi news
माणकोली पुलावरील वाहन संख्या वाढल्याने डोंबिवलीतील रेतीबंदर रेल्वे फाटकात वाहनांच्या रांगा

हेही वाचा: उरण ठरतंय अनधिकृत बांधकामाचं आगार

खास करून या पुला शेजारीच असलेल्या तुकाराम हरी वाजेकर विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी याच पुलावरून प्रवास करीत आहेत. त्यामुळे नवघर येथील उड्डाणपुलाची दुरुस्ती त्याचप्रमाणे विजेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे.
सिडकोचे दुर्लक्ष : या उड्डाणपुलाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही सिडकोची असून नवघर येथील नागरिकांनी मागणी करूनही सिडको कडून दुर्लक्ष केले जात.